PM Kisan Samman Nidhi Yojana: पीएम किसानबाबत मोठी अपडेट, सरकारने दिली महत्त्वाची माहिती!

PM Kisan: या योजनेंतर्गंत प्रत्येक आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात, जे तीन हप्त्यांमध्ये मिळतात.
PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi YojanaDainik Gomantak
Published on
Updated on

PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) 14 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.

या हप्त्यांचे पैसे प्रत्येक वेळेप्रमाणे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. या योजनेंतर्गंत प्रत्येक आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात, जे तीन हप्त्यांमध्ये मिळतात.

11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला

दरम्यान, जेव्हापासून केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे, तेव्हापासून आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना (Farmer) 2.42 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. पीआयबीच्या ट्विटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

अहवालानुसार, 27 फेब्रुवारी 2023 रोजी 13 वा हप्ता वितरीत केल्यानंतर, 14 वा हप्ता जूनमध्ये जारी होण्याची शक्यता आहे. मात्र, 14 व्या हप्त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi Scheme: प्रतीक्षा लवकरच संपणार! जूनच्या 'या' आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 14 वा हप्ता

आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा उद्देश

पीआयबीच्या ट्विटनुसार, पीएम-किसानचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांना सशक्त करणे हे आहे. ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, जमिनीची मालकी असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांना सामाजिक-आर्थिक सुरक्षा प्रदान करताना तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 प्रदान केले जातात.

पीएम किसान eKYC

पीएम किसान वेबसाइटनुसार, 'पीएम किसानच्या सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी EKYC अनिवार्य आहे. OTP आधारित eKYC पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्ही बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधू शकता.

PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan FPO Yojana: PM मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, खात्यात येणार एवढे लाख रुपये; असा करा अर्ज

पीएम किसान योजना म्हणजे काय?

पीएम किसान योजना पीएम मोदींनी 2019 मध्ये सुरु केली होती. ही एक महत्त्वाची सरकारी योजना आहे, ज्यामध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यात वार्षिक 6000 रुपये पाठवले जातात. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com