SBI Customers Alert, SBI Guidelines for customers, Alert for SBI Customers
SBI Customers Alert, SBI Guidelines for customers, Alert for SBI Customers  Dainik Gomantak
अर्थविश्व

Customer Care Number: 'गुगल'वर एक चूक पडली महागात, बँकेतून 8.24 लाख रूपये उडाले, तुम्ही 'ही' चूक करत नाही ना?

Akshay Nirmale

Online Search Customer Care Number: इंटरनेटच्या वापरासोबत सायबर फसवणुकीच्या घटनांत देखील वाढ होत चालली आहे. लोकांना फसवण्यासाठी सायबर घोटाळेबाज विविध प्रकारचे सापळे लावत असतात.

नुकतेच नोएडा येथून ऑनलाइन फसवणुकीचे असे एक प्रकरण समोर आले आहे. यात एका यूजरची ८.२४ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीचे हे संपूर्ण प्रकरण ऑनलाइन सर्चमध्ये झालेल्या चुकीशी संबंधित आहे.

या फसवणुकीतील व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहे. डिशवॉशरसाठी ग्राहक सेवा क्रमांक ऑनलाइन शोधताना हा फसवणुकीचा प्रकार घडला होता. पीडित दाम्पत्य नोएडाच्या सेक्टर 133 मध्ये राहते.

अमरजीत सिंग आणि त्यांची पत्नी गुगलवर IFB डिशवॉशरचा कस्टमर केअर नंबर शोधत होते. त्यांच्या पत्नीने 1800258821 हा क्रमांक ऑनलाइन सर्चमधून काढला, जो IFB कस्टमर केअरच्या नावाने गुगलवर होता. मात्र, हा आकडा आता बंधन बँकेची ग्राहक सेवा म्हणून दिसून येत होता. पत्नीने या नंबरवर कॉल केला तेव्हा एका महिलेने फोन उचलला आणि तिच्या वरिष्ठांना कॉल कनेक्ट करत असल्याचे सांगितले.

कथित वरिष्ठ अधिकाऱ्याने महिलेला फोनमध्ये AnyDesk अॅप डाउनलोड करण्यास सांगितले आणि तिला काही तपशील विचारले. यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला 10 रुपयांचा व्यवहार करण्यास सांगितले, जेणेकरून तक्रार दाखल करता येईल.

या सर्व प्रक्रियेत संबंधितांचे फोन अनेकदा डिसकनेक्ट झाले. फसवणूक करणाऱ्यांनी त्या महिलेच्या वैयक्तिक नंबरवर सतत कॉल केले. त्याच दिवशी दुपारी 4.15 वाजता तिच्या पतीच्या खात्यातून 2.25 लाख रुपयांचे व्यवहार झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला दुसरा मेसेज दिसला, तो ५.९९ लाख रुपयांचा होता. पीडितेने या प्रकरणाची माहिती पोलीस आणि बँक दोघांनाही दिली. यानंतर बँकेने त्यांचे संयुक्त खाते गोठवले. मात्र, तोपर्यंत सुमारे आठ लाखाहून अधिक रक्कम त्यांच्या खात्यातून चोरली गेली होती.

यामुळे जेव्हा ग्राहक ऑनलाइन सर्च करतो तेव्हा त्याला हा फेक नंबर दिसतो. जर एखाद्या वापरकर्त्याने त्यांच्या जाळ्यात अडकल्यानंतर कॉल केला तर घोटाळेबाज त्याची फसवणूक करतात. अशा घोटाळ्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, आपण ऑनलाइन शोधताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

कोणत्याही क्रमांकावर कॉल न करता कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ग्राहक सेवा क्रमांक मिळवा. त्याच वेळी, तुमच्या वैयक्तिक डिव्हाइसवर कधीही AnyDesk किंवा इतर कोणतेही अॅप डाउनलोड करू नका.

हे अॅप घोटाळेबाजांना तुमचा सर्व डेटा पुरवते. शिवाय कस्टमर केअर कधीही पैसे मागत नाही, एखाद्या सेवेसाठी पैसे मोजावे लागले तरी ते सेवा पूर्ण झाल्यानंतर द्यावे लागतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT