Microsoft plans to invest in Oyo Dainik Gomantak
अर्थविश्व

Microsoft चा Oyo मध्ये गुंतवणुकीचा विचार

दैनिक गोमन्तक

आयटी मधील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट(Microsoft) आता एका नवीन क्षेत्रात गुंतवणुक करण्याचा विचार करत आहे.मायक्रोसॉफ्ट कंपनी आता सर्वात मोठा हॉटेल व्यवसाय करणाऱ्या ओयोकंपनीमध्ये(OYO) गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. काही दिवसांतच ओयो मार्केटमध्ये आपला आयपीओ(IPO) लाँच करणार आहे आणि या आयपीओपूर्वी जवळपास 9 अब्ज डॉलर्स मूल्यांकनासह ऑनलाईन हॉटेल चेन ओयो मध्ये गुंतवणुक करण्याचा विचार करत आहे. (Microsoft plans to invest in Oyo)

जर हा करार पूर्ण झाला तर ओयो मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवांचा वापर करू शकेल. ओयोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल म्हणाले की, गुडगाव-मुख्यालय असलेली कंपनी संभाव्य सार्वजनिक ऑफरवर विचार करत आहे परंतु त्याबद्दल अंतिम निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सॉफ्टबँक समर्थित ओयो ही भारतातील सर्वात मोठी हॉटेल चेन कंपनी आहे. आणि जगात हॉटेललाईन मध्ये ओयो सहाव्या क्रमांकावर आहे. 2013 मध्ये रितेश अग्रवाल यांनी स्थापन केलेला हा व्यवसाय जगभरातील बजेट हॉटेल्ससाठी बुकिंग सेवा एकत्रितपाने पुरवते. ओयोचे भारतातील 18,000 हॉटेल्स मध्ये सेवा पुरवतो आणि ते 415 पेक्षा जास्त भारतीय शहरांमध्ये आहे. यात जागतिक स्तराचा विचार करता 1 दशलक्षाहून अधिक खोल्या आहेत ज्यात 800 शहरांमध्ये 23,000 हून अधिक विशेष हॉटेल्सही आहेत.

कोरोनाच्या लाटेत हॉटेल व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे अनेक हॉटेल्स डबघाईला आले आणि अनेक कामगारांना आपली नोकरीही गमवावी लागली.मात्र या महिन्याच्या सुरुवातीला, ओयो हॉटेल्स अँड होम्सने जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून त्याच्या विद्यमान कर्जासाठी 660 दशलक्ष डॉलर कर्ज घेऊन . सध्या अस्तित्त्वात असलेल्या कर्जाची भरपाई करण्याबरोबरच या नुकसानीपासून मुक्त होण्याचे त्यांचे उद्दीष्ट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT