मागील बऱ्याच दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने(RBI) निमयांचे पालन न करणाऱ्या वित्तीय संस्था आणि बँकांवर बेधडकपणे कारवाईचा बडगा उचलायला सुरूवात केली आहे. ज्या बँका किंवा संस्था आरबीआयच्या नियमांचे पालन करणार नाहीत अशांना आरबीआयच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक बँकांना नियमांचे योग्य पालन न केल्याप्रकरणी कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. याच अनुषंगाने आता आणखीन एका ]मोठ्या कंपनीवर आरबीआयने कारवाई केली आहे. MasterCard या कंपनीवर मोठी कारवाई करत मास्टरकार्ड एशिया/पॅसिफिक पीटीईवर आरबीआयने बंदी आणली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डेटा स्टोरेज नियमांचे पालन न केल्याचे नमूद करून मास्टरकार्डला देशात नवीन ग्राहकांना ऑनबोर्डिंग करण्यास बंदी घातली आहे. 2018 पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अॅक्टच्या कलम 17 अंतर्गत आरबीआयने भारतातील सर्व पेमेंट सिस्टम ऑपरेटरला भारतीयांकडून निर्माण केलेला कोणताही पेमेंट डेटा स्थानिक पातळीवर साठविला जावा याची असे सांगितले होते.
सर्व पेमेंट सिस्टम ऑपरेटरला आरबीआयकडे एक अनुपालन अहवाल सादर करण्यास आणि सिस्टम ऑडिटला मान्य करण्यास सांगितले गेले.
“पुरेसा वेळ आणि पुरेशी संधी दिली गेली असूनही, ती देयक प्रणाली डेटा संग्रहित करण्याच्या निर्देशांचे पालन करीत नसल्याचे दिसून आले आहे,” असे सांगत आरबीआयने ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र या आदेशाचा मास्टरकार्डच्या विद्यमान ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.असेही आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याअगोदरही या वर्षाच्या सुरूवातीस, आरबीआयने अमेरिकन एक्स्प्रेस आणि डिनर्स क्लब इंटरनॅशनलच्या विरोधात असेच निर्देश दिले होते, त्यानुसार भारतीय ग्राहकांना नवीन कार्ड देण्यास मनाई केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.