Upcoming Cars New Year  Dainik Gomantak
अर्थविश्व

Upcoming Cars: नविन वर्षात मारुतीच्या 'जिम्नी'सह महिंद्राची 'थार' होणार लॉंच

महिंद्रा नव्या वर्षात थार चे नवे मॉडेल लॉंच करणार आहे.

दैनिक गोमन्तक

तुम्हाला जर कारची क्रेझ असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नविन वर्षात (New Year) मारुती सुझुकी आणि महिद्राने नव्या कार लॉंच करणार आहेत. यामध्ये ब्रेझा आणि ग्रँड विटाराच्या सीएनजी चे नवे मॉडेल पाहायला मिळणार आहे. 

  • मारुताची MPV

नविन वर्षात मारुती सुझुकी देशात दोन नवीन SUV लाँच करणार आहे. त्याचवेळी, कंपनी टोयोटाच्या नवीन इनोव्हा हायक्रॉसवर आधारित नवीन एमपीव्ही पुढील वर्षीच्या सणासुदीपर्यंत देशात लॉंच करणार आहे. यासह कंपनी 2023 ऑटो एक्सपोमध्ये कोडनेम YTB आणि 5-डोर जिम्नी लाइफस्टाइल SUV हे देखील लॉंच करणार आहे.

मारुती एसयूव्ही कूप बलेनो क्रॉस नावाने मार्केटमध्ये उतरणार असल्याची माहिती आहे. जी कंपनीच्या लाइटवेट HEARTECT प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. नवीन SUV कूपचे स्टाइलिंग Futuro-e संकल्पनेने प्रेरित असेल. जे 2020 ऑटो एक्सपोमध्ये लॉंच केले गेले होते. नवीन मॉडेलला बलेनो हॅचबॅक सारखे इंटिरियर आणि फीचर्स मिळतील. यासोबतच काही एक्स्ट्रा फीचर्स देखील बघायला मिळतात. यात सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह 1.0-लिटर बूस्टरजेट पेट्रोल इंजिन मिळेल. तसेच, 1.2L Dualjet पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील मिळू शकतो.

maruti suv

जिम्नी होणार लॉंच

नव्या वर्षात ऑटो एक्स्पोमध्ये 5-दार असलेली मारुती जिम्नी देखील लॉंच होणार आहे. पर्यायी म्हणून साइड फेसिंग जंप सीट्ससह 3-रो फिचरमध्ये 5 आणि 7-सीट लेआउटमध्ये कार पाहायला मिळणार आहे. यात सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह 1.5-लीटर K15B पेट्रोल इंजिन मिळेल. ज्यामध्ये टू-व्हील-ड्राइव्ह हाय (2H) आणि फोर-व्हील-ड्राइव्ह हाय (4H) पर्याय उपलब्ध असतील. ही कार उत्कृष्ट ऑफ-रोडिंग क्षमतेने सुसज्ज असेल.

jimny
  • महिंद्रा थार

महिंद्रा नविन वर्षात आपल्या अत्यंत लोकप्रिय ऑफ रोड एसयूव्ही थारची 5 डोअर असलेले वर्जन आणणार आहे. या कारची लांबी सध्याच्या थारपेक्षा जास्त असेल आणि तिला जास्त जागाही मिळेल. पण त्याची पॉवरट्रेन सध्याच्या मॉडेलप्रमाणेच राहील. या कारची टेस्ट भारतीय रस्त्यांवर सुरू आहे, जी अनेक वेळा स्पॉट झाली आहे.

mahindra thar

मारुती एमपीवी

मारुती सुझुकीचे हे सर्वात महागडे मॉडेल असणार आहे. जे टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉस एमपीव्हीवर आधारित असणार आहे. नविन वर्षात तसेच सणासुदीच्या काळात लॉंच केले जाणार आहे. टोयोटा मारुतीला इनोव्हा हायक्रॉसचा पुरवठा करेल, ज्यामध्ये मारुती मार्केटमध्ये आणण्यापूर्वी काही बदल करेल. ही कार मजबूत हायब्रीड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.

Maruti MPV

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT