Twitter Gold Tick: ट्विटरने लॉन्च केली 'गोल्ड टिक', जाणून घ्या संपूर्ण माहिती

Twitter Verified Accounts Features: ट्विटरवर आता व्हेरिफाईड अकाउंटसाठी तीन रंग वापरले जाणार आहेत.
Twitter Gold Tick
Twitter Gold TickDainik Gomantak
Published on
Updated on

जर तुम्ही ट्विटर वापरकर्ता असाल आणि बऱ्याच काळापासून ट्विटरच्या अपडेटेड अकाउंट व्हेरिफिकेशन प्रोग्रामची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ट्विटरने (Twitter) आपला व्हेरिफाईड अकाउंटसाठी नवे फिचर सुरू केले आहे. या अंतर्गत आता व्हेरिफाईड अकाउंटसाठी तीन रंग वापरले जाणार आहेत. रंग वेगवेगळ्या श्रेणीनुसार विभागले जातात. आता तुम्हाला कोणत्या रंगाच्या टिक्स मिळतील आणि कोणता रंग कोणासाठी वापरला जाईल हे आम्ही सांगणार आहोत.

ट्विटरने हे फीचर लॉन्च करताना ट्विटरचे नवे सीईओ एलन मस्क म्हणाले की, आता व्हेरिफाईड अकाउंट तीन श्रेणींमध्ये विभागली गेली आहेत आणि त्यानुसार त्यांचा रंगही ठरवण्यात आला आहे. गोल्ड कलरची व्हेरिफाईड टिक कंपन्यांसाठी असेल. दुसरीकडे, सरकारी संस्था किंवा सरकारशी संबंधित खात्यांसाठी राखाडी रंगाची टिक उपलब्ध करून दिली जाईल. त्याच वेळी, निळ्या रंगाची टिक व्यक्तीसाठी उपलब्ध असेल.

मस्क (Elon Musk) यांनी स्पष्ट केले की सत्यापित खाते मॅन्युअली प्रमाणीकृत केले जाईल. या प्रक्रियेत काही कमतरता असल्यास खात्याची पडताळणी केली जाणार नाही. एवढेच नाही तर, नोटेबल आणि ऑफिशियल असे वेगवेगळे टॅग मर्यादित असल्याने ते प्रत्येकाला दिले जाणार नाही.

twitter
twitterDainik Gomantak

दरम्यान, एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर अनेक कारणांमुळे चर्चेत राहीले आहे. कारण त्यांनी कंपनीत अनेक बदल केले आहेत. कंपनी दररोज ४ मिलीयन डॉलर्सच्या तोट्यात चालत असून कंपनी फायद्यात आणण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचे ते म्हणाले आहेत. म्हणूनच ब्लू टिक पेड केले गेले आहे, म्हणजेच युजर्सला ब्लू टिकसाठी पैसे ध्यावे लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com