Maruti Suzuki Cars Price| Maruti Suzuki Discount 2022 | Maruti Suzuki Selling Price in 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

Maruti Suzuki : कार खरेदी करायचीए? मारुतीच्या 'या' कारवर मिळतोय बंपर डिस्काऊंट

वर्षअखेरीस अनेक ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांना नवीन कार खरेदीवर विविध सवलती देतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Maruti Suzuki : वर्षअखेरीस अनेक ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांना नवीन कार खरेदीवर विविध सवलती देतात. तुमची जुनी कार देऊन त्याच्याबदल्यात तुम्हाला उत्तम ऑफर्स वर्षाच्या अखेरीस सुरु असलेल्या सेलमध्ये मिळत असतात. अशीच एक बंपर ऑफर मारुती सुझुकी घेऊन आली आहे. आता तुम्हाला तुमच्या जुन्या कारच्या बदल्यात मारुती कारच्या खरेदीवर चांगली ऑफर मिळू शकते. म्हणजे आता तुम्ही तुमच्या पार्किंगमधील जुनी कार काढून नवीन कार आणू शकता. मारुती सुझुकी तुम्‍हाला तुमच्‍या जुन्या कारच्या एक्स्चेंजवर तब्बल 10,000 रुपयांपर्यंत सूट देते.

मारुती सुझुकीची बलेनो नोव्हेंबर महिन्यात देशात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली होती. नोव्हेंबर महिन्यात कारच्या 20000 युनिट्सची विक्री झाली होती. ही मारुतीची प्रीमियम हॅचबॅक कार आहे, जी Nexa डीलरशिपद्वारे विकली जाते. मारुती या कारवर क्वचितप्रसंगी सूट देण्यात येते. पण या डिसेंबरमध्ये मारुती बलेनो आपल्या ग्राहकांना 20,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. 

एक्सचेंज ऑफर म्हणजे काय?

मारुती सुझुकी कंपनी डिसेंबर महिन्यात बलेनोच्या सर्व मॅन्युअल प्रकारांवर 20,000 रुपयांची सूट देत आहे. यामध्ये 10,000 रुपयांच्या ग्राहक ऑफरचा समावेश आहे. याशिवाय तुम्ही तुमची जुनी कार एक्सचेंज केल्यास तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर मिळेल. कंपनी AGS वर कोणतीही सूट देत नाही.

मारुतीच्या बलेनो कारची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 6.49 लाखांपासून सुरु होत आहे. हीच किंमत टॉप एंड व्हेरिएंटवर 9.71 लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती सुझुकीने नुकतेच आपल्या बलेनो कारचे सीएनजी मॉडेलही भारतात लॉन्च केले आहे. बलेनोचे सीएनजी मॉडेल दोन प्रकारात उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेत या कारच्या CNG मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.28 लाख रुपये आहे. Baleno S-CNG मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे. या कारचं इंजिन 5-स्पीड ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT