Maruti Jimny new SUV car to compete with mahindra Thar Dainik Gomantak
अर्थविश्व

Thar ला टक्कर देणार मारुती जिम्नीची नवी SUV कार, किंमत जाणून ग्राहक होणार खूश

मारुती जिम्नीची ऑफ-रोड एसयूव्ही देणार महिंद्रा थार आणि फोर्स गुरखाला टक्कर

दैनिक गोमन्तक

सध्या ट्रेंडिग कारच्या गजात महिंद्राच्या थारची जादू बघायला मिळत आहे. अशातच मारुति सुज़ुकी जिम्नीही पुढच्या वर्षी लाँच होणार्‍या सर्वात प्रतिक्षित नवीन कारपैकी एक आहे. आणि ही कार थार पाठोपाठ चर्चेत आहे. कंपनी ऑफ-रोड एसयूव्हीची 5-दार असलेली नविन कार महिंद्रा थार आणि फोर्स गुरखाला टक्कर देणार आहे. अलीकडील अहवालानुसार, 5-दरवाज्यांची मारुति जिम्नी 5 आणि 7-सीटिंग कॉन्फ़िगरेशनसह ऑफर केली जाणार आहे. (Maruti Jimny SUV)

मारुती सुझुकी जिम्नी फेब्रुवारी 2023 मध्ये लॉंन्च होणार होते. मात्र, सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे त्यास विलंब झाला. कंपनी जून 2022 च्या अखेरीस जिमनीचे प्री-प्रॉडक्शन ट्रेल्स सुरू करणार असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात, मॉडेलची निर्मिती जवळपास 70 टक्के स्थानिक पातळीवरील घटकांसह केली जाईल. मारुती सुझुकी हळूहळू स्थानिकीकरणाची पातळी वाढवेल आणि सुरुवातीच्या वर्षांत सुमारे 75,000 युनिट्सचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवणार आहे.

थारपेक्षा स्वस्त असेल एसयूवी

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, इंडो-जपानी वाहन निर्मात्याला डिझेल जिम्नी तयार करण्यासाठी बोर्ड आणि अधिकाऱ्यांची मंजुरी मिळणे बाकी आहे, परंतु ते त्यावर काम करत आहेत. नवीन मारुती जिम्नी 7-सीटर महिंद्रा थारला आव्हान देईल, तर 5-सीटर व्हेरियंटची लांबी -4 मीटरपेक्षा कमी असेल. जिम्नी थारच्या तुलनेत खूपच स्वस्त असेल, असा दावा कंपनीने केला आहे.

जिम्नीचे इंजिन शक्तिशाली असेल

नवीन मारुती जिम्नी 1.5 लीटर पेट्रोल इंजिनसह येणार आहे, जे 6,000rpm वर 102PS ची पीक पॉवर आणि 4,000rpm वर 130Nm टॉर्क देईल. ऑफ-रोड एसयूव्ही शिडी फ्रेम चेसिसला अंडरपिन करेल आणि सुझुकीच्या ऑलग्रिप प्रो 4 व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान, 3-लिंक रिजिड एक्सल सस्पेंशन आणि लो रेंज ट्रान्सफर गेरसह येईल.

नवीन SUV दिवाळीला लॉन्च होईल

सध्या जपानी ऑटोमेकर जिम्नी कपंनी जगभरातील 194 मार्केटमध्ये आपले वर्चस्व राखून आहे. कंपनी भारतातील कोलंबिया आणि पेरूसह निर्यात बाजारांसाठी CKD किटद्वारे 3-दर असलेली कार विकत आहे.याशिवाय, मारुती सुझुकी 2022 च्या दिवाळी सीझनच्या जवळ आपली पहिली मध्यम आकाराची SUV कार मार्केटमध्ये आणणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT