Mahindra Scorpio N SUV: या दिवशी होणार लाँच

महिंद्रा कंपनी Mahindra Scorpio N SUV 27 जून 2022 रोजी देशात लाँच होणार आहे .
Mahindra Scorpio 2022
Mahindra Scorpio 2022Dainik Gomantak

महिंद्रा अँड महिंद्राने नवीन पिढीच्या स्कॉर्पिओबद्दल आणखी एक मोठी माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले की नवीन एसयूव्ही 27 जून 2022 रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. कंपनी Scorpio N नावाने नवीन SUV लाँच करणार आहे.

विशेष म्हणजे सध्याच्या मॉडेलची विक्री Scorpio Classic या नावाने सुरू ठेवली जाईल. महिंद्रा कंपनीचे ही गाडी तरुण आणि तंत्रज्ञान जाणणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन केली आहे. ज्यांना फुल साइज SUV चालवायला आवडते त्यांचासाठी ही गाडी उत्तम आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की नवीन स्कॉर्पिओ ठळक डिझाइन आणि कमांडिंग ड्रायव्हिंग पोझिशन या नव्या फीचरसह तयार केली गेली आहे. (New Generation Mahindra Scorpio N News )

2022 स्कॉर्पिओचा टीझर रिलीज करताना, महिंद्रा ऑटोमोटिव्हने त्याला बिग डॅडी ऑफ एसयूव्ही अशी टॅगलाइन दिली आहे. कंपनीने नवीन Scorpio N सोबत अनेक नवीन आणि फीचर्स दिले आहेत. ज्यामुळे ते सध्याच्या मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.

महिंद्रा (Mahindra) अँड महिंद्राचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, “स्कॉर्पिओ हे महिंद्राचे ऐतिहासिक मॉडेल आहे. ज्याने या श्रेणीसाठी एक स्थान निर्माण केले आहे. ऑटोमोबाईल उद्योगातील एक प्रतिष्ठित ब्रँड बनला आहे. सर्व-नवीन Scorpio N पुन्हा एकदा SUV सेगमेंटमध्ये नवीन बेंचमार्क सेट करेल. नवीन स्कॉर्पिओ आमच्या ग्राहकांना वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आणि उत्तम अनुभव देण्याचे आमचे ध्येय पूर्ण होते.”

Mahindra Scorpio 2022
IRCTC टूर पॅकेज; दार्जिलिंग अन् गंगटोकला द्या भेट

* या गाडीमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनची सुविधा

या गाडीमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनची सोय केली आहे. जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेसशी जुळलेले आहेत. याशिवाय, नवीन एसयूव्ही 4 बाय 4 पर्यायांसह देखील सादर केली जाईल. 'Mahindra Scorpio N' ला ग्राहकांची जोरदार मागणी मिळण्याची अपेक्षा आहे. नवीन स्कॉर्पिओसाठी आता ग्राहकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com