Upcoming Hybrid Cars 2025 Dainik Gomantak
अर्थविश्व

Upcoming Hybrid Cars 2025: मारुती-ह्युंदाई लवकरच लॉन्च करणार 'या' 5 शानदार हायब्रिड कार; इलेक्ट्रिक कार्स जाल विसरुन

Hybrid Cars In India: गेल्या काही वर्षात भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रीक कारची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली. मात्र आता लोकांना इलेक्ट्रिक कारबाबत रेंज आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची चिंता सतावू लागली आहे.

Manish Jadhav

गेल्या काही वर्षात भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रीक कारची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली. मात्र आता लोकांना इलेक्ट्रिक कारबाबत रेंज आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची चिंता सतावू लागली आहे. अशा परिस्थितीत, मारुती-ह्युंदाई सारख्या कंपन्यांनी आता देशात हायब्रिड कार लॉन्च करण्याची योजना आखली आहे. या गाड्यांमुळे तुम्हाला चांगले मायलेज तर मिळेलच, पण त्यासोबतच तुमची रेंज आणि चार्जिंग सुविधेची काळजीही मिटेल. येत्या 2 वर्षांत लॉन्च होणाऱ्या गाड्या पाहिल्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिक गाड्या देखील विसरुन जाल.

Maruti Fronx Hybrid

अलिकडेच, मारुती सुझुकी इंडियाच्या मीड-साइज एसयूव्ही फ्रँक्सचे हायब्रिड व्हर्जन टेस्टिंगदरम्यान दिसले. मात्र, ही कार सध्या केवळ रॅपिंगमध्येच दिसत आहे. या कारमध्ये (Car) मारुतीने स्वतः डेव्हलप केलेली हायब्रिड टेक्नॉलॉजी असू शकते. कंपनी सध्या टोयोटच्या सहकार्याने हायब्रिड टेक्नॉलॉजी वापरत आहे.

Hyundai Creta 7-Seater Premium

मारुतीप्रमाणेच, देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार कंपनी ह्युंदाई मोटर इंडियानेही हायब्रिड सेगमेंटमध्ये एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्युंदाई मोटर इंडियाने अलीकडेच त्यांची सर्वात लोकप्रिय 7-सीटर कार ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक अवतारात सादर केली. आता कंपनी हे मॉडेल हायब्रिड-पेट्रोल व्हेरिएंटमध्ये देखील लॉन्च करु शकते.

Maruti Grand Vitara 7-Seater

मारुतीने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही ग्रँड विटाराचे इलेक्ट्रिक मॉडेल, मारुती ईविटारा लॉन्च केले आहे. कंपनी लवकरच या कारचा व्हीलबेस वाढवून त्याचे 7-सीटर व्हर्जन देखील आणणार आहे. खास गोष्ट म्हणजे कंपनी हायब्रिड टेक्नॉलॉजीसह मारुती ग्रँड विटारा 7-सीटर लॉन्च करु शकते.

Toyota HyRyder 7-Seater

हायब्रिड टेक्नॉलॉजीचा वापर करुन कार बनवण्यात टोयोटाही मागे नाही. टोयोटाच्या हायब्रिड टेक्नॉलॉजीचा वापर मारुती सुझुकी देखील करते. बाजारात हायब्रिडची वाढती मागणी पाहता, कंपनी त्यांच्या अर्बन क्रूझर हायरायडरचे (Urban Cruiser HyRyder) पुढील पिढीचे मॉडेल लॉन्च करणार आहे. त्याचे 7-सीटर व्हर्जन देखील यावर्षी लॉन्च केले जाऊ शकते.

Kia Seltos

किआ इंडियाची सर्वात लोकप्रिय कार सेल्टोसची अपग्रेडेड व्हर्जन लवकरच येत आहे. त्याचे जागतिक स्तरावर पदार्पण आणि भारतात लाँचिंग 2026 मध्येच होण्याची शक्यता आहे. या अपग्रेड केलेल्या व्हर्जनमध्ये अनेक बदल असतील. कंपनी त्यात पेट्रोल हायब्रिड पॉवरट्रेनचा ऑप्शन देऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT