Maruti Gypsy EV Dainik Gomantak
अर्थविश्व

Maruti Gypsy EV Launched: मारुती जिप्सीचे इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च, भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल

मारुती जिप्सीचे इलेक्ट्रिक मॉडेल खास भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Maruti Gypsy EV Launched: भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने त्यांच्या ऑफ-रोड SUV जिप्सीचे इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च केले आहे. मारुती जिप्सीचे इलेक्ट्रिक मॉडेल खास भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आले आहे.

मारुती सुझुकी जिप्सीचे इलेक्ट्रिक मॉडेल भारतीय लष्कर, IIT दिल्ली आणि Tadpole Project नावाच्या स्टार्टअपने संयुक्तपणे विकसित केले आहे.

आर्मी कमांडर कॉन्फरन्समध्ये मारुती जिप्सी ईव्हीचे (Maruti Gypsy EV) प्रदर्शन करण्यात आले आहे. एका डिफेन्स न्यूजने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

मारुती सुझुकीची जिप्सी सर्वप्रथम डिसेंबर 1985 मध्ये लॉन्च झाली होती. मारुती सुझुकी जिप्सीचे उत्पादन 2018 मध्ये बंद करण्यात आले होते.

Tadpole Project नावाच्या स्टार्टअपने मारुती सुझुकीच्या जिप्सीच्या इलेक्ट्रिक मॉडेलचे काम केले आहे. या स्टार्टअपची स्थापना आयआयटी दिल्ली अंतर्गत करण्यात आली आहे.

Tadpole नावाच्या स्टार्टअपच्या अधिकृत वेबसाइटनुसार, Tadpole प्रकल्प मुख्यत्वे जुन्या गाड्या आणि मारुती जिप्सीसोबत काम करतो. हे स्टार्टअप जुन्या व्हिंटेज कार्सचे रीट्रोफिट देखील करते, ज्याद्वारे जुन्या गाड्या सुधारित केल्या जातात आणि नवीन पद्धतीने तयार केल्या जातात.

मारुती इलेक्ट्रिक जिप्सी पांढऱ्या रंगाची असून तिला आर्मी लूक देण्यासाठी ठिकठिकाणी हिरव्या रंगाचे टच आहेत. मारुती जिप्सीच्या इलेक्ट्रिक मॉडेलच्या डिझाईनबद्दल सांगायचे तर त्याच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मारुती जिप्सी ईव्हीवर इंडियन आर्मी इलेक्ट्रिक आणि ईव्ही सारखा मजकूर लिहिला आहे, त्याच्या चाकांना हिरवा टच देखील देण्यात आला आहे.

मारुती सुझुकी जिप्सीच्या इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये मागच्या दारावर पट्टा लावला असून, त्यावर भारतीय लष्कराचा लोगोही दिसतो.

नवीन मारुती जिप्सी इलेक्ट्रिकमध्ये 30 kW क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो एका चार्जमध्ये 120 किमीचे मायलेज देतो. त्याची बॅटरी 06 ते 07 तासांत पूर्ण चार्ज होते. जिप्सी इलेक्ट्रिक मोटरवर 02 वर्षांची वॉरंटी आणि बॅटरीवर 04 वर्षांची वॉरंटी देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT