Market wealth increased by 2 lakh cr. Reliance Industries earned 94 thousand in week  Dainik Gomantak
अर्थविश्व

रिलायन्सचा 94 हजार कोटींचा फायदा, 8 कंपन्यांच्ये मार्केटकॅप 2 लाखांच्या पार

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) मार्केट कॅपिटलायझेशन रिपोर्टिंग आठवड्यात 93,823.76 कोटी रुपयांनी वाढून 16,93,170.17 कोटी रुपये इतके झाले आहे

दैनिक गोमन्तक

सेन्सेक्सच्या (Sensex) पहिल्या दहापैकी आठ कंपन्यांचे मार्केट कॅप (Market Cap) गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 2,32,800.35 कोटी रुपयांनी वाढले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सर्वाधिक लाभात होते. गेल्या आठवड्यात बीएसईच्या (BSE) 30 शेअर्सचा (Share market) सेन्सेक्स 1,293.48 अंकांनी किंवा शुक्रवारी सेन्सेक्सने 60,000 चा आकडा पार केला होता. (Market wealth increased by 2 lakh cr. Reliance Industries earned 94 thousand in week)

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅपिटलायझेशन रिपोर्टिंग आठवड्यात 93,823.76 कोटी रुपयांनी वाढून 16,93,170.17 कोटी रुपये इतके झाले आहे .तर टीसीएसचे बाजार मूल्यांकन 76,200.46 कोटी रुपयांच्या उडीसह 14,55,687.69 कोटी रुपये होते. या कालावधीत इन्फोसिसची बाजारपेठ 24,857.35 कोटी रुपयांनी वाढून 7,31,107.12 कोटी रुपये आणि बजाज फायनान्सची 12,913.91 कोटी रुपयांनी वाढून 4,66,940.59 कोटी रुपये झाली. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्यांकन आठवड्यात 10,881.09 कोटी रुपयांनी वाढून 8,87,210.54 कोटी रुपये झाले.

ICICI बँकेचा 7400 कोटींचा फायदा

ICICI बँकेचे बाजार भांडवल 7,403.24 कोटी रुपयांनी वाढून 4,87,388.37 कोटी झाले. त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाची बाजार स्थिती 5,310.14 कोटी रुपयांनी वाढून 4,08,479.47 कोटी आणि HDFC ची बाजारपेठ 1,410.4 कोटी रुपयांनी वाढून 4,91,841.14 कोटी रुपये झाली.

हिंदुस्थान युनिलिव्हरचे 15 हजार कोटींचे नुकसान

तर याउलट दुसरीकडे हिंदुस्थान युनिलिव्हर लि. कंपनीचे बाजार भांडवल 14,614.46 कोटी रुपयांनी घटून 6,20,362.58 कोटी रुपये झाले तर कोटक महिंद्रा बँकेचे मूल्यांकन 11,697.38 कोटी रुपयांनी घटून 3,83,866.29 कोटी रुपये झाले आहे.

रिलायन्सचे मार्केट कॅप 17 लाख कोटी

सेन्सेक्सच्या पहिल्या दहा कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने पुन्हा आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एसबीआय आणि कोटक महिंद्रा यांचा या स यादीत समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT