Medicine
Medicine Dainik Gomantak
अर्थविश्व

मेडिसीन संदर्भात सरकारी नियमात मोठा बदल

दैनिक गोमन्तक

मेडिसीन संदर्भात तुमच्यासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. तुम्ही आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय 16 औषधे (Medicine) खरेदी करू शकणार आहात. यासाठी सरकार काही नियमात बदल करणार आहे. सरकारने ओव्हर-द-काउंटर (OTC) श्रेणी सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यासाठी औषध आणि सौंदर्य प्रसाधने नियमांमध्ये बदल करावे लागणार आहेत. यानंतर लोक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायच आवश्यक औषधे खरेदी करू शकणार आहात. (Major changes in government regulations regarding medicine)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) यासंदर्भात एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केले आहे ज्यामध्ये 16 औषधे आहेत. यामध्ये Paracetamol 500 मिग्रॅ, काही लेग्जेटिव्स, Decongestants आणि अँटीफंगल क्रीम यांचा देखील समावेश आहे. मंत्रालय या प्रस्तावावर लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहे.

सध्या औषधांच्या दुकानात अशी अनेक औषधे आहेत, जी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय उपलब्ध होऊ शकतात. परंतु, सध्या OTC औषधांसाठी कोणताही कायदा नाहीये. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मनीकंट्रोलला सांगितले आहे की, या वर्षाच्या सुरुवातीला ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्ड (DTAB) ने OTC औषधांवरील सरकारच्या नवीन धोरणाला मान्यता दिली आहे. DTAB ही औषधांच्या बाबतीत सरकारला सल्ला देणाऱ्या सर्वोच्च संस्थांपैकीच एक आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, "यानंतर, ओटीसी श्रेणीसाठी मंजूर औषधांवर विस्तृत चर्चा झाली आहे. सुरुवातीला या श्रेणीमध्ये 16 औषधांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नंतर या यादीचा विस्तार केला जाईल आणि आणखी औषधांचा त्यात समावेश केला जाणार आहे.

ओटीसी श्रेणीत येणाऱ्या औषधांच्या वापरासाठी ही अट घालण्यात आली आल्याचे सांगण्यात येत आहे. उपचाराचा कालावधी पाच दिवसांपेक्षा जास्त नसेल तरच ओटीसी श्रेणीतील औषधे औषधांच्या दुकानात विकली जातील, अशी अट देखील घालण्यात आली आहे. दुसरे म्हणजे, समस्या संपत नसल्यास, रुग्णाला डॉक्टरांचा सल्ला प्रमाणे औषधोपचार करावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

SCROLL FOR NEXT