ITR Filing New Rules
ITR Filing New Rules  Dainik Gomantak
अर्थविश्व

ITR भरण्याच्या नियमात 21 एप्रिलपासून मोठा बदल; जाणून घ्या संपूर्ण माहिती

दैनिक गोमन्तक

ITR Filing New Rules : तुम्ही देखील करदाते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सरकारने टॅक्स रिटर्न भरण्याच्या नियमात बदल केला आहे. वास्तविक, अधिकाधिक लोकांना कराच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारने आयकर भरण्याची व्याप्ती वाढवली आहे. अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. (Major change in ITR filing rules from 21st April)

अर्थ मंत्रालयाने जारी केले आदेश

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार, आता विविध उत्पन्न गट आणि उत्पन्न असलेल्या लोकांनाही आयकर विवरणपत्र भरावे लागणार आहे. नव्या नियमानुसार आता अधिकाधिक लोकांना कराच्या कक्षेत आणता येणार आहे. हे नवीन नियम 21एप्रिलपासून लागू झाले आहेत.

नवीन नियम काय आहेत?

नव्या नियमानुसार कोणत्याही व्यवसायातील विक्री, उलाढाल किंवा उत्पन्न 60 लाखांपेक्षा जास्त असल्यास त्या व्यावसायिकाला रिटर्न भरावे लागणार आहे. पगारदार व्यक्तीची वार्षिक कमाई 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असली तरीही त्यांना ITR भरावा लागेल. TDS आणि TCS ची रक्कम एका वर्षात 25,000 रुपयांपेक्षा जास्त असली तरीही आयकर रिटर्न भरावे लागते. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या करदात्‍यांसाठी टीडीएस आणि टीसीएसची मर्यादा 50,000 रुपये ठेवण्यात आली आहे.

नवीन नियमानुसार, जर बँक बचत खात्यात 1 वर्षात 50 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केली असेल तर अशा ठेवीदारांना त्यांचे कर विवरणपत्र भरावे लागणार आहे. नवीन बदलांमुळे आयकर भरण्याची व्याप्ती वाढेल आणि अधिकाधिक लोक कराच्या रचनेत येऊ शकतील, असा सरकारचा विश्वास आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

SCROLL FOR NEXT