Health Recruitment Dainik Gomantak
अर्थविश्व

Health Recruitment: आरोग्य विभागात नोकरीची सुवर्ण संधी, दहा हजारांहून अधिक जागा भरणार

राज्य सरकारकडून नुकतीच 75 हजार सरकारी नोकर भरतीची घोषणा केरण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

राज्य सरकारकडून अलिकडेच 75 हजार सरकारी नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाकडून देखील मोठ्या नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज ही घोषणा केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा आरोग्य विभागाची भरती घोषित करण्यात आली आहे. आज या संदर्भात माहिती देताना गिरीश महाजनांनी सांगितले, गेल्या काही काळात राज्यात भरतीकडे दुर्लक्ष झालं होतं. आता आम्ही 10027 हजार जागांची भरती केली जाणार आहे.

  • महत्वाच्या तारखा

1 ते 7 जानेवारी दरम्यान आरोग्य विभागाची भरतीची जाहीरात निघणार आहे. 25 ते 30 जानेवारी अर्ज करता येतील. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान अर्जाची छाननी तर 25 आणि 26 मार्च रोजी परीक्षा होईल. 27 एप्रिलपर्यंत उमेदवार निवड होईल. तसेच एकाच दिवशी राज्यभरात ही परीक्षा होईल.

  • एकाच दिवशी परीक्षा पार पडतील

महाजन म्हणाले की, 2018 पासून भरतीची प्रतीक्षा होती. टीईटीसह आरोग्य विभागाचा घोटाळा गेल्या सरकारमध्ये झाला होता. त्यामुळे परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. जिल्हा निवड समिती यावेळी परीक्षा घेईल. यंदा एकाच दिवशी परीक्षा पार पडतील. ही परीक्षा सुरळीत घेणार असल्याचे सांगत यावेळी गडबड होऊ देणार नाही, असंही महाजन म्हणाले.

  • या पाच पदांच्या परीक्षा

आरोग्य सेवक

आरोग्य सेविका

पर्यवेक्षक

औषध निर्माता

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

  • ठाकरे सरकारच्या काळात आरोग्य भरती घोटाळा उघड

राज्यात मागील ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण समोर आले होते. यामुळे परीक्षाच रद्द करण्यात आली होती. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे आता उघडकीस आले होते. या प्रकरणात राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालकांसह अनेकांना अटक करण्यात आली होती.

youtube.com/watch?v=Ouduoct9ACM

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

‘गृहमंत्री गोव्‍याच्‍या मूडवर बोलले, गुंडगिरीवर नाही'; युरींचे टीकास्त्र; काणकोणकर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सांगे, कुंकळ्ळीत मेणबत्ती मोर्चा

RSS: 'महासत्तेसाठी संघ बनणार पंचप्राण'! CM सावंतांचे प्रतिपादन; गणवेषात विजयादशमी उत्सवात झाले सहभागी

Goa Politics: "तुम्ही भाजपची B-Team, आम्हीच तुम्हाला नाकारतो", काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत; गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे'

Diwali 2025: पणत्या बनवण्याचा वारसा मावळतोय! डिचोलीतील व्यवसाय अंधाराखाली; राज्याबाहेरील पणत्यांची चलती

SCROLL FOR NEXT