काही दिवसांपूर्वी Paytm, LIC या दोन बड्या कंपन्यानांचा आयपीओ आला व बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता बँक ऑफ बडोदा समर्थित इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स (BoB-backed IndiaFirst Life Insurance) या वर्षी IPO बाजारात घेऊन येत आहे. कंपनीने सेबीकडे (SEBI) याबाबत कागदपत्रे सादर केली आहेत. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, या महाकाय IPO ची किंमत 500 कोटी रुपये असेल तसेच, कंपनी 141.2 दशलक्ष शेअर्स विकण्याचा विचार करत आहे.
LIC आणि गो डिजिट इन्शुरन्स नंतर इंडियाफर्स्ट लाइफ ही तिसरी विमा कंपनी आहे, ज्याने यावर्षी सेबीकडे IPO साठी कागदपत्रे दाखल केली आहेत.
कोणाचा किती वाटा?
प्रमोटर्स बँक ऑफ बडोदा आणि कार्मेल पॉइंट इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये अनुक्रमे 89 दशलक्ष आणि 39.22 दशलक्ष शेअर्सची विक्री करतील. तर, युनियन बँक ऑफ इंडिया 13.05 दशलक्ष शेअर्स विकणार आहे.
बँक ऑफ इंडियाचा (BoB) 65 टक्के हिस्सा
जीवन विमा कंपनीमध्ये बँक ऑफ इंडियाची (BoB) 65 टक्के आणि युनियन बँक ऑफ इंडियाची 9 टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित 26 टक्के भाग कार्मेल पॉइंट इन्व्हेस्टमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि वॉरबर्ग पिंकस एलएलसी, न्यूयॉर्क या खाजगी इक्विटी फंडांच्या मालकीचा आहे.
इंडियाफर्स्टच्यापूर्वी ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स, SBI लाइफ इन्शुरन्स, HDFC लाइफ इन्शुरन्स आणि (LIC) लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असे चार आयपीओ आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.