LPG Cylinders  Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG Price: नवीन वर्षात सरकारकडून मिळणार गूड न्यूज, सिलिंडरच्या किमतीत होणार मोठी कपात!

Lpg Price Latest Updates: महागड्या एलपीजी सिलिंडरचा फटका सहन करणाऱ्या लोकांना नवीन वर्षात मोठा दिलासा मिळू शकतो.

दैनिक गोमन्तक

Lpg Price Latest Updates: महागड्या एलपीजी सिलिंडरचा फटका सहन करणाऱ्या लोकांना नवीन वर्षात मोठा दिलासा मिळू शकतो. या वर्षी जुलैपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 30 टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत. तेव्हापासून भारतात एलपीजी सिलिंडरची किंमत 1056 रुपये आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्षात सरकार एलपीजीच्या किमतीत मोठी सवलत जाहीर करु शकते. असे झाल्यास नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही बातमी लोकांना दिलासा देणारी ठरेल.

जुलै 2022 नंतर किंमतींमध्ये कोणताही बदल नाही

भारतात तेल आणि वायूचे आवश्यकतेनुसार पुरेसे उत्पादन होत नाही. अशा परिस्थितीत पुरवठ्यासाठी त्याला परदेशावर अवलंबून राहावे लागते. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार होत असल्याने भारतातील (India) तेल आणि वायूच्या किमतीतही चढ-उतार होत असतात.

तसेच, सरकारने तेल आणि वायूच्या किंमती ठरवण्याचे अधिकार सरकारी कंपन्यांना (तेल विपणन कंपन्या) दिले आहेत. या कंपन्यांनी 6 जुलै 2022 पासून एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. याच काळात आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल आणि वायूच्या किमती 30 टक्क्यांनी घसरल्या आहेत. म्हणजेच, कंपन्या तेल आणि गॅस अत्यंत स्वस्तात विकत घेत आहेत आणि लोकांना महागड्या किमतीत विकत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती 30 टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत

ऑक्टोबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $85 होती. त्या काळात देशात एलपीजी सिलिंडर 899 रुपयांना मिळत होता. तेव्हापासून आतापर्यंत सरकारने या दरात सुमारे दीडशे रुपयांची वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत आता प्रतिबॅरल 83 डॉलरवर आली आहे. म्हणजेच, ऑक्‍टोबर 2021 पासून तेलाच्या किमतीही कमी झाल्या आहेत. त्यानुसार, नवीन वर्षात सरकार (Government) एलपीजी सिलिंडरवर 150 रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा करु शकते, असे मानले जात आहे.

गेहलोत सरकारने मोठा डाव खेळला

राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. हे पाहता गेहलोत सरकारने मोठा डाव खेळला आहे. सीएम अशोक गेहलोत यांनी घोषणा केली की, 1 एप्रिल 2023 पासून राजस्थानमधील लोकांना घरगुती गॅस सिलिंडर 500 रुपये (एलपीजी किंमत) मध्ये उपलब्ध केले जातील. जयपूरमध्ये एलपीजी सिलिंडरची सध्याची किंमत 1056 रुपये आहे. म्हणजेच, गेहलोत सरकार पुढच्या वर्षी अर्ध्यापेक्षा कमी किमतीत लोकांना एलपीजी सिलिंडर उपलब्ध करुन देणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT