LPG price, bank rules, Railway time table will change from 1st November  Dainik Gomantak
अर्थविश्व

1 नोव्हेंबरपासून LPG गॅस आणि आपल्या बँकेत होणार मोठे बदल, जाणून घ्या

या चार बदलांमध्ये एलपीजी वितरण प्रणालीतील बदल, ठेवी आणि पैसे काढण्याबाबतचे बँक नियम, एलपीजीच्या किमती आणि रेल्वेचे वेळापत्रक यांचा समावेश असणार आहे.

दैनिक गोमन्तक

1 नोव्हेंबरपासून बँक (Bank) संदर्भातील आणि LPG गॅस संदर्भातील अनेक नियम बदलणार आहेत. हे सर्व नियम थेट आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे असणार आहेत .या नियमांच्या बदलांचा आपल्या खर्चावर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणून, 1 तारीख येण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या जेणेकरून होत असणारे हे बदल वेळेवर आणि व्यवस्थित पद्धतीने हाताळता येतील.या चार बदलांमध्ये एलपीजी वितरण प्रणालीतील बदल(LPG Gas Delivery), ठेवी आणि पैसे काढण्याबाबतचे बँक नियम, एलपीजीच्या किमती आणि रेल्वेचे वेळापत्रक यांचा समावेश असणार आहे. (LPG price, bank rules, Railway time table will change from 1st November)

1-एलपीजी वितरण प्रणाली

एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे ज्यांना गॅस एजन्सीच्या विक्रेत्याकडून एलपीजी सिलिंडर घरपोच मिळेल, त्यांना पुढील महिन्यापासून नवीन नियमांनुसार या सेवेचा लाभ मिळू शकेल. नवीन नियम असा असेल की आता ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो OTP गॅस विक्रेत्याला सांगावा लागेल. या ओटीपीच्या आधारे एलपीजी सिलिंडर घरपोच दिला जाईल.म्हणजेच गॅस डिलिव्हरी घेताना तुम्हाला आता एक OTP देणे अनिवार्य असणार आहे.

या नवीन बदलाला डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) असे नाव देण्यात आले आहे. सिलिंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचावा आणि सिलिंडरचा काळाबाजार रोखता यावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याआधी कुणाचा सिलिंडर दुसऱ्याला चढ्या किमतीत विकला जात होता, मात्र ओटीपी सुरू केल्याने असे होणार नाही.

2-LPG च्या किमती वाढणार

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल आणि वायूच्या किमतीत झपाट्याने होत असलेली वाढ पाहता, 1 नोव्हेंबरला एलव्हीजी सिलिंडरच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. तेल विक्रेते दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत सुधारणा करतात. त्यामुळे 1 नोव्हेंबरला एलपीजीच्या किमती वाढू शकतात, असे ग्राहकांनी गृहीत धरावे.अशी माहिती तद्यांकडून मिळत आहे.

यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे 6 ऑक्टोबर रोजी एलपीजीच्या दरात 15 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. अनुदानित आणि विनाअनुदानितदोन्ही एलपीजीच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या . यासह जुलैपासून 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत एकूण 90 रुपयांची वाढ झाली आहे. आता दिल्ली आणि मुंबईमध्ये एलपीजीची किंमत 899.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. तर कोलकात्यात तो 926 रुपये आहे.

3-बँकेतील कॅश डिपॉजिट आणि पैसे काढणेही महागणार

1 नोव्हेंबरपासून बँकेत रोख रक्कम जमा करणे आणि पैसे काढण्याचे नियम बदलणार आहेत. हा नियम बँक ऑफ बडोदासाठी आहे. बँक एका ठराविक मर्यादेनंतर पैसे काढणे किंवा रोख रक्कम जमा करण्यावरील शुल्कात बदल करणार आहे. हा नवा नियम बचत आणि पगार या दोन्ही खात्यांवर लागू होणार आहे. बँक ऑफ इंडिया, पीएनबी, अॅक्सिस बँक आणि सेंट्रल बँकही लवकरच असा निर्णय घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT