LPG Cylinder price on rise in India Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG गॅस पुन्हा महागला; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

नवीन दरवाढीसह 14.2 किलोचे LPG सिलिंडर मागील सहा महिन्यांत 140 रुपयांनी महागला आहे.

Sudhir Kakde

जुलै महिन्याच्या सुरूवातीस आपल्या खिशावर अजुन भार पडणार असल्याची शक्यता आहे. कारण आता महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अनुदान नसलेल्या एलपीजी सिलिंडरच्या नवीन किंमती लागू केल्या जात आहेत. स्वयंपाक गॅस सिलिंडर आजपासून महाग झाले आहेत. प्रति सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपये वाढ करण्यात आली आहे. तसेच 19 किलोचे व्यावसायिक सिलिंडर 76 रुपयांनी महाग झाले आहे. नुकत्याच लागु झालेल्या नवीन दरवाढीसह 14.2 किलोचे सिलिंडर मागील सहा महिन्यांत 140 रुपयांनी महागला आहे. (LPG gas prices have gone up.)

जर दिल्ली-मुंबईबद्दल किमतींचा विचार केला तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) च्या मते, आजपासून आपण अनुदानित 14.2 किलोचे घरगुती गॅस सिलिंडर 834.50 रुपयांना मिळणार आहे. देशात एलपीजी गॅसची सर्वात जास्त किंमत चेन्नईमध्ये आहे. चेन्नईमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत 850.50 एवढी आहे. IOC देशात इंडेन या ब्रँडखाली एलपीजी गॅस सिलिंडर्स पुरवतो.

जाणुन घ्या मोठ्या शहरांमध्ये LPGचे दर काय आहेत?

- दिल्लीत 14.2 किलो सिलिंडरची किंमत 809 रुपयांवरून 834.59 रुपयांवर गेली.

- कोलकातामध्ये 14.2 किलो सिलिंडरची किंमत 835.50 रुपयांना विकला जाणार आहे.

- मुंबईत ग्राहकांना 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 809 ऐवजी 834.50 रुपये मोजावे लागणार.

- चेन्नईत सिलिंडरसाठी ग्राहकांना 825 ऐवजी 850.50 रुपये द्यावे लागणार आहे.


सध्या सरकार दरवर्षी 14.2 किलोच्या 12 सिलिंडर्सवर प्रत्येक कुटूंबाला अनुदान देते. यापेक्षा कोणतेही अधिक सिलिंडर खरेदी करायचा असेल तर, बाजारभावानुसार गॅस खरेदी करावा लागतो. या अनुदानाची रक्कम दर महिन्याला वेगवेळी असते. अनुदानाचा दर कच्च्या तेलावर आणि फॉरेक्स दरावर अवलंबून असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

SCROLL FOR NEXT