LPG Dainik Gomantak
अर्थविश्व

गॅसच्या किमतीबाबत मोठी अपडेट, केंद्र सरकारने घेतला असा निर्णय, LPG Cylinder झाला स्वस्त!

Gas Price Update: केंद्र सरकारने गॅसच्या दरांबाबत मोठा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

Manish Jadhav

Gas Price Update: केंद्र सरकारने गॅसच्या दरांबाबत मोठा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

सरकारने सांगितले की, नवीन धोरणानुसार आता गॅसच्या किमती निश्चित केल्या जातील. सरकारने शुक्रवारी नवीन किंमत सूत्रानुसार उर्वरित एप्रिलसाठी नैसर्गिक वायूची किंमत $7.92 प्रति एमएमबीटीयू निश्चित केली. तथापि, ग्राहकांसाठी (Customers) दर $6.5 प्रति एमएमबीटीयू इतके मर्यादित केले आहेत.

पेट्रोलियम मंत्रालयाने ही माहिती दिली

पेट्रोलियम मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाने एका आदेशात म्हटले आहे की, 8 एप्रिल ते 30 एप्रिलसाठी नैसर्गिक वायूची किंमत प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटसाठी US $ 7.92 असेल. आयात कच्च्या तेलाच्या सरासरी किमतीच्या 10 टक्के या आधारावर ही किंमत निश्चित करण्यात आली आहे.

किमती किती कमी होतील?

या निर्णयानंतर दिल्लीत (Delhi) सीएनजीची किंमत 79.56 रुपये प्रति किलोवरुन 73.59 रुपये आणि पीएनजीची किंमत 53.59 रुपये प्रति हजार क्यूबिक मीटरवरुन 47.59 रुपये प्रति हजार क्यूबिक मीटरवर कमी होणार आहे.

मुंबईत सीएनजी 87 रुपयांऐवजी 79 रुपये प्रति किलो आणि पीएनजी 54 रुपयांऐवजी 49 रुपये प्रति हजार घनमीटर असेल.

पुनरावलोकन 2 वेळा होते

PPAC ने आदेशात म्हटले आहे की, 1 एप्रिल ते 7 एप्रिल पर्यंत APM गॅसची किंमत $9.16 प्रति एमएमबीटीयू असेल. त्यांनी सांगितले की, दर महिन्याला किंमती निश्चित केल्या जातील, तर आतापर्यंत वर्षातून दोनदा त्यांचा आढावा घेतला जातो.

अधिसूचनेत म्हटले आहे की, 'पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेलद्वारे महिन्याच्या शेवटच्या दिवशी एपीएम किमती मासिक आधारावर घोषित केल्या जातील.' सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतील कपातीचा फायदा ग्राहकांना मिळावा यासाठी सरकार किमतींवर लक्ष ठेवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT