देशातील सामान्य नागरिकाला महागाईचे (Inflation) चटके बसत आहेत. दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढ, इंधन दरवाढ यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या पेट्रोल - डिझेलच्या किंमती गगनाला भिडत असताना, सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinder Price) किंमतीत मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी (01 ऑगस्ट) सकाळी दर कपातीबाबत घोषणा करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत आजपासून 36 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या नवीनतम कपातीसह, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 2012.50 रुपयांऐवजी 1,976 रुपये होणार आहे. दर कपात करून, सरकारने व्यावसायिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा देण्याचे काम केले आहे.
दरम्यान, डॉलरच्या (Doller) तुलनेत भारतीय रुपयाची (Indian Rupee) ऐतिहासिक घसरण झाली आहे. एका डॉलरची किंमत आपल्यासाठी 80 रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. मागील आठ वर्षात रूपयाच्या किमतीत 25 टक्के घसरण झाली असल्याचे दिसून आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.