LPG Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG Price Hike: LPG सिलिंडर आजपासून पुन्हा महागणार

1 मार्च 2022 पासून कॉमर्शियल गॅस (Commercial Gas) घेणाऱ्यांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील कोरोनाचं सावट काहीसं ओसरलं असलं तरी महागाईचा भडका दिवसेंदिवस वाढूच लागला आहे. यातच आता गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीचा फटकाही जनतेला बसू लागला आहे. राष्ट्रीय तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किमतीत वाढ केल्याची माहिती मिळत आहे. 1 मार्च 2022 पासून कॉमर्शियल गॅस घेणाऱ्यांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे. (LPG Cylinders Will Be Expensive Again From March 1 2022)

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, छोट्या आणि मोठ्या आकाराच्या कॉमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता सुधारित किमतींनुसार राजधानी दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 105 रुपयांनी महागला आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये त्याची किंमत 108 रुपयांनी वाढली आहे. दिल्लीत आता 19 किलोच्या सिलेंडरसाठी 2,012 रुपये मोजावे लागणार आहेत. 5 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरातही 27 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता राजधानीत व्यावसायिक ग्राहकांसाठी या सिलिंडरची किंमत 569 रुपयांवर गेली आहे. या नवीनतम किंमती आजपासून लागू होतील.

तसेच, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती सिलिंडर जुन्या किमतीतच मिळणार आहेत. गेल्या महिन्यातील कपातीनंतर या महिन्यातील वाढीमुळे हिशेबांची बरोबरी झाली आहे. 1 फेब्रुवारी 2022 रोजी तेल कंपन्यांनी कॉमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत 91.50 रुपयांची कपात केली होती, त्यानंतर दिल्लीत 19 किलोच्या कॉमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 1907 रुपयांवर गेली होती. देशात दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या किमती बदलल्या जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT