customer Dainik Gomantak
अर्थविश्व

Cheaper And Costlier Things: 1 एप्रिलपासून काय महागणार, काय स्वस्त होणार; पाहा संपूर्ण लिस्ट

Changes From 1st April: 31 मार्चनंतर 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यावर अनेक बदल होणार आहेत.

Manish Jadhav

Changes From 1st April: 31 मार्चनंतर 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यावर अनेक बदल होणार आहेत.

सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्याने अनेक वस्तू महाग होणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

खरे तर 1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अनेक गोष्टींवरील कर वाढवल्यामुळे त्यांच्या किमतीत वाढ करावी लागली आहे. हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे.

काय स्वस्त होईल

1 एप्रिल 2023 पासून अनेक गोष्टींवरील कस्टम ड्युटी 5 टक्क्यांवरुन 2.5 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे या गोष्टींची किंमत कमी होईल.

यामध्ये मोबाईल फोन, कॅमेरा, एलईडी टीव्ही, बायोगॅसशी संबंधित वस्तू, इलेक्ट्रिक कार, खेळणी, हीट कॉइल, हिऱ्यांचे दागिने, बायोगॅसशी संबंधित वस्तू, सायकल इत्यादींचा समावेश आहे.

UPI द्वारे होणारे व्यवहारही महागणार आहेत

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे व्यापारी व्यवहारांवर शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे. हा बदल 1 एप्रिलपासून लागू केला जाऊ शकतो.

परिपत्रकानुसार 1 एप्रिलपासून 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के अधिभार लावण्याची सूचना करण्यात आली आहे. हे शुल्क व्यापाऱ्यांच्या व्यवहाराला म्हणजेच व्यापाऱ्यांना पैसे देणाऱ्या ग्राहकांना (Customer) द्यावे लागेल.

एलपीजी सिलेंडर

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमतीचा आढावा घेतला जातो. या 1 एप्रिल रोजी पेट्रोलियम कंपन्या दरात वाढ करु शकतात.

यापूर्वी, 1 मार्च रोजी कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर दिल्लीत त्याची किंमत 1103 रुपये झाली. पूर्वी ते रु.1053 मध्ये उपलब्ध होते. यावेळीही तेल कंपन्या सिलिंडरचे दर वाढवू शकतात, अशी शक्यता आहे.

गाड्यांच्या किमतीही वाढणार आहेत

जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर 1 एप्रिलपासून ती देखील महाग होणार आहे. टाटा मोटर्स, हिरो मोटो कॉर्प आणि मारुती या कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होतील. कंपन्यांकडून वेगवेगळ्या मॉडेल्सच्या आधारे किंमत वाढवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT