मांडवी तीरावर 'परशुराम अवतरण महोत्सव', 7 दिवस विविध कार्यक्रम; पुतळ्यावर 'लाईट अँड साऊंड शो'

Bhagwan Parshuram Avtaran Mahotsav 2026: सात दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते रविवारी सायं. ५.३० वा. होणार आहे.
Mandovi
MandoviDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्ट्रीय परशुराम परिषद (गोवा प्रदेश) आणि पणजी नववर्ष स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच गोवा सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याच्या आणि गोवा मनोरंज संस्था यांच्या सहकार्याने ‘गोमंतक जनक भगवान परशुराम अवतरण महोत्सव २०२६’ मांडवी नदीकाठी दर्यासंगम येथील परशुराम पुतळ्याजवळ रविवार (ता. १९ ते २६ एप्रिल) दरम्यान आयोजित करण्यात येत आहे.

या सातदिवसीय महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते रविवारी सायं. ५.३० वा. होणार आहे. भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात देशभरातून भाविक, संत, मान्यवर आणि सांस्कृतिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रेमपाल सिंग यांनी दिली. या वेळी महेश कांदोळकर, प्रसाद कामत, शिरीष नाईक, अमित नागर, गजेंद्र सिंग राजपुरोहित व गुरप्रीत सिंग उपस्थित होते.

Mandovi
Goa Mankurad Mango: 5 हजारांवरून दर थेट 800 रुपयांवर, स्वस्त झाला 'मानकुराद'! येत्या आठवड्यात दर अजून कोसळण्याची शक्यता

तरुण पिढीसाठी मूल्यांचा संदेश

भगवान परशुरामांचे जीवन धर्म, धैर्य आणि समाजसेवेचे प्रतीक आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून तरुण पिढीला या मूल्यांशी जोडण्याचा आणि गोव्याला आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश कांदोळकर यांनी सांगितले.

महाआरतीमुळे दररोज भक्तिमय वातावरण

१९ एप्रिल रोजी कलशयात्रा आणि दीपप्रज्वलनाने महोत्सवाची सुरुवात होईल, त्यानंतर भगवान परशुरामांची महाआरती होईल. १९ ते २५ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. २० ते २४ एप्रिल दरम्यान परमपूज्य दिलीप कृष्ण भारद्वाज महाराज यांच्या हस्ते भगवान परशुराम कथा वाचन होईल. या कथांमधून त्यांच्या जीवनातील आदर्श आणि धर्मशिक्षण मांडले जाईल. दररोज सायंकाळी काशीहून आलेल्या पुजाऱ्यांकडून महाआरती होणार असून, मांडवी तीर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे.

Mandovi
Goa Education: सरकारी शाळांत 380 शिक्षकांची पदे रिक्त, 'त्‍या' निर्णयामुळे शिक्षक भासणार कमी

‘लाईट अँड साऊंड’मधून चरित्र दर्शन : महोत्सव कालावधीत भगवान परशुराम यांच्या पुतळ्यावर दररोज प्रकाश व ध्वनी (लाईट अँड साऊंड) कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या माध्यमातून त्यांच्या कार्याचा आणि शिकवणीचा परिचय करून दिला जाईल. आठवडाभर पूजा, सांस्कृतिक आणि भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com