आज कोणत्याही भारतीय (India) नागरिकांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड (Pan Card) हे अत्यंत महत्वाचे आहेत. तुमचा आधार-पॅन कार्डशी लिंक नसेल, तर लगेच तुमचे आधार कार्ड-पॅनला लिंक करा. अन्यथा, आता तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. सरकारने आधारशी पॅन लिंक (Pan Card) करण्यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख आहे.
आधार कार्ड पॅन कार्डशी करा असे लिंक
* जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले असेल, तर तुम्ही या लिंकवर क्लिक करून तुमची माहिती तपासु शकता. यासाठी तुम्हाला
https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या लिंकवर जावे लागेल.
* डाव्या बाजूला Link Aadhar या पर्यायावर क्लिक करा. तुमचे स्टेटस पाहण्यासाठी 'Click Here' वर क्लिक करावे.
* तुमचे स्टेटस पाहण्यासाठी 'Click Here' या हायपर लिंकवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमच्या आधार आणि पॅन कार्डचे डिटेल्स भरावे लागतील.
* जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले असेल, तर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले आहे असा संदेश येतो.
* जर तुम्ही अद्याप आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर
जर तुम्ही अद्याप आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल, तर तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या लिंकवर जावून तपशील भरावा. त्यानंतर Link Aadhar वर लिंक करावे.
* यानंतर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होणार
SMSद्वारे देखील करू शकता लिंक
वापरकर्ते 567678 किंवा 56161 वर एसएमएस (SMS) पाठवून दोन्ही सहजपणे लिंक करू शकता. आधार क्रमांकाशी पॅन लिंक करण्यासाठी, वापरकर्त्याला UIDPAN<Space> <12 अंकी आधार क्रमांक > <Space> <10 अंकी टाइप करून एसएमएस पाठवावा लागेल. वरील क्रमांकावर एसएमएस पाठवल्यानंतर आधार पॅन क्रमांकाशी जोडला जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.