LIC Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC चा IPO प्राइस बँड 902 ते 949 रुपयादरम्यान: सूत्र

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC चा IPO प्राइस बँड 902 ते 949 रु. दरम्यान असेल.

दैनिक गोमन्तक

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC चा IPO प्राइस बँड 902 ते 949 रु. दरम्यान असेल. सरकारी सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. ही देशातील सर्वात मोठी पब्लिक इश्यू ऑफर असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची किंमत 902 ते 949 रुपयांदरम्यान असेल. यामध्ये LIC पॉलिसीधारकांना 60 रुपयांची सूट मिळेल. तर किरकोळ गुंतवणूकदार आणि कंपनी कर्मचाऱ्यांना 45 रुपयांची सूट मिळणार आहे. हा IPO 2 मे रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी उघडला जाईल. त्यानंतर 4 ते 9 मे या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. एलआयसी बोर्डाने शनिवारी आयपीओचा आकार 5 टक्क्यांवरुन 3.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मान्यता दिली होती.

दरम्यान, बाजार नियामक अर्थात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या मंजुरीवर ते अवलंबून असले तरी या स्टेकच्या विक्रीतून सरकारला सुमारे 21 हजार कोटी रुपये मिळण्याची आपेक्षा आहे. ही हिस्सेदारी 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा पर्याय खुला असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे असले तरी, असे झाल्यास सरकारला सुमारे 30 हजार कोटी रुपये मिळू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT