LIC Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC विलीनीकरणावर मोठी अपडेट, 'या' 4 सरकारी विमा कंपन्या होणार विलीन! जाणून घ्या डिटेल्स

LIC Merger News: देशात सुरु असलेल्या खासगीकरण आणि विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

LIC Merger News: देशात सुरु असलेल्या खासगीकरण आणि विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता देशातील चार सरकारी जनरल इन्शुरन्स कंपन्या एलआयसीमध्ये विलीन होऊ शकतात. यामध्ये नॅशनल इन्शुरन्स, न्यू इंडिया अॅश्युरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचा समावेश आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) कायदा 1999 आणि विमा कायदा 1938 अंतर्गत त्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असे व्यावसायिक तज्ञांनी म्हटले आहे.

प्रस्तावित दुरुस्तीत काय म्हटले आहे?

प्रस्तावित सुधारणांमध्ये असे नमूद केले आहे की, देशात जीवन आणि जीवनेत्तर विमा पॉलिसी विकण्यासाठी एकच मान्यताप्राप्त कंपनी असावी, जी विमा नियामकाला किमान आवश्यक भांडवल निर्धारित करुन वैधानिक मर्यादा काढून टाकण्यास मदत करेल. त्यात आणखी एक कृषी विमा कंपनी विलीन केली जाऊ शकते, अशीही माहिती देण्यात आली आहे.

खरे तर, या विषयावर माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी जाहीर केले होते की, धोरणात्मक क्षेत्रांच्या बाबतीत केवळ चार कंपन्या सरकारी असू शकतात. म्हणजेच, अशा प्रकारे सरकार आपल्या चार नॉन-लाइफ इन्शुरन्स कंपन्यांचे LIC मध्ये विलीनीकरण करु शकते. दुसरीकडे, या कंपन्यांचे एलआयसीमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी या कंपन्यांचे कर्मचारीही (Employees) करत आहेत.

एलआयसीची कमान खाजगी हातात

दुसरीकडे, एक मोठी बातमी समोर येत आहे की, आता खासगी क्षेत्रातील लोकांना एलआयसीमध्ये अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, 66 वर्षात पहिल्यांदाच LIC चे नियंत्रण खाजगी चेअरमनच्या हातात गेले आहे. आतापर्यंतच्या नियमानुसार कंपनीच्या एमडीलाच अध्यक्ष बनवले जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

Goa Live Updates: सांकवाळ येथे फ्लॅटमध्ये चोरी; 8 लाखांचा ऐवज लंपास

Majorda: धिरयोत उधळला रेडा, छातीत खुपसले शिंग; माजोर्डा मृत्यूप्रकरणातील संशयित अमेरिकेत, पोलिसांच्या वाढल्या अडचणी

Corlim Accident: ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर! भरधाव गाडीने दिली पादचाऱ्याला धडक; 39 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Bhai Dooj 2025: '7 रंगांचे तिलक, न कोमेजणारा हार'; नेपाळमध्ये कशी साजरी होते भाऊबीज? जाणून घ्या आगळीवेगळी प्रथा..

SCROLL FOR NEXT