LIC मध्ये होणार मोठा बदल, सरकारने केली पूर्ण तयारी; 'खाजगी क्षेत्रातील व्यक्तीला...'!

LIC Big Update: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) मध्ये मोठा बदल होणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली आहे.
LIC
LIC Dainik Gomantak
Published on
Updated on

LIC Big Update: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) मध्ये मोठा बदल होणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली आहे. कंपनी आता स्वतःचे आधुनिकीकरण करण्यासाठी नवीन योजना बनवत आहे. एलआयसी ( LIC Of India) चा हा बदल गुंतवणूकदारांना (LIC Share Price) आणि कंपनीच्या ग्राहकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीला आता आधुनिक ट्रॅकवर आणण्याची गरज असून त्यासाठी कंपनीच्या सीईओची नियुक्ती करण्याची गरज आहे.

LIC
Anil Ambani: LIC ला मोठा झटका, अनिल अंबानींच्या कंपनीत बुडणार 3,400 कोटी रुपये!

खाजगी क्षेत्रातील सीईओ जबाबदारी घेऊ शकतात

सरकारी अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी क्षेत्रातील व्यावसायिकाची LIC चे पहिले CEO म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते, ज्यामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना (Investors) मोठा फायदा होईल. LIC 41 लाख कोटी रुपयांचा निधी ($ 500.69 अब्ज) हाताळते.

66 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हे काम होणार आहे

गेल्या 66 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कंपनीच्या सीईओची नियुक्ती होणार आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, सरकार LIC सीईओच्या नियुक्तीसाठी पात्रता निकष विस्तृत करण्याची योजना देखील आखत आहे.

LIC
LIC Scheme: एलआयसीची सुपरहिट पॉलिसी! 44 रुपये जमा करुन मिळवा 27 लाख

आता अर्थ मंत्रालयाची जबाबदारी आहे

अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या एलआयसीच्या कामकाजाची जबाबदारी पूर्णपणे अर्थ मंत्रालयाकडे आहे. कंपनीचा एक अध्यक्ष आहे, जो इतर सर्व कामकाज पाहतो. यानंतर सरकार खाजगी क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांची नियुक्ती करेल.

LIC
LIC Policy Scheme: LIC च्या या 3 योजना देतायेत बंपर रिटर्न, जाणून घ्या

नियमात मोठा बदल केला

खाजगी क्षेत्रातील सीईओ नियुक्त करण्यासाठी सरकारने एलआयसीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा भागधारकांना मोठा फायदा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे, तिची स्थापना 1956 मध्ये झाली. ती पूर्णपणे सरकारच्या मालकीची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com