LIC IPO Shares Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC IPO: आज होणार एलआयसीच्या शेअर्सचे वाटप, येथे तपासा

एलआयसीच्या शेअर्सचे वाटप आज होणार आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा (LIC) आयपीओ चार मे रोजी गुंतवणुकदारांसाठी खुला करण्यात आला होता. भारतीय आयुर्विमा महांडळाच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) साठी बोली लावल्यानंतर आता सर्वांचे डोळे हे आयपीओच्या वाटपाकडे लागलेले आहेत. दरम्यान आज एलआयसीच्या शेअर्सचे वाटपाची शक्यता वर्तवली जात आहे. (LIC IPO Shares of LIC to be distributed today check here)

ज्यांनी आयपीओसाठी अर्ज केला आहे, ते बीएसई वेबसाइटवर किंवा रजिस्ट्रार केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर एलआयसीच्या आयपीओ वाटपाबाबतची संपुर्ण स्थिती जाणून घेऊ शकता. तसेच शेअर्स (Shares) ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. एलआयसीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे देखील दिसून आले. एलआयसीच्या आयपीओला जवळपास तीन पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एलआयसी कर्मचारी आणि विमाधारकांचा या आयपीओला सर्वाधिक प्रतिसाद दिसून आला आहे.

अशी चेक करा आयपीओ वाटपाची संपुर्ण स्थिती

एलआयसीच्या आयपीओसाठी ज्यांनी बोली लावली त्यांना घर बसल्या आयपीओ वाटपाची स्थिती ऑनलाईन चेक करता येणार आहे. त्यासाठी त्यांना बीएसईच्या अधिकृत वेबसाइट bseindia.com किंवा केफिन टेकच्या वेबसाईट karisma.kfintech.com वर लॉगइन करावे लागेल. या दोन्ही वेबसाईटवर बोलीदारांना एलयासीच्या आयपीओ वाटपाची स्थिती चेक करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला वरीलपैकी कोणत्यातरी एका वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तीथे लॉगइन करून एलआयसी आयपीओचा अर्ज क्रमांक समाविष्ट करावा लागेल. त्यानंतर तुमचा आवश्यक तपशीलातील पॅनची माहिती भरा आणि त्यानंतर तुम्ही आयपीओ संदर्भातील माहिती पाहू शकातात.

विमाधारकांचा सर्वाधिक प्रतिसाद

देशातीलस सर्वात मोठा आयपीओ असलेल्या एलआयसीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी चार मे रोजी खुला केला होता, तर नऊ मे रोजी बंद करण्यात आला आहे. आयपीओमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी एलआयसीच्या विमाधारकांना आयपीओच्या शेअरमागे तब्बल साठ रुपयांची सूट देण्यात आली होती, तर एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना शेअरमागे 45 रुपयांची सूट देण्यात आली. सुट मिळाल्यामुळे विमाधारक आणि कर्मचाऱ्यांनी आयपीओसाठी मोठ्या प्रमाणात बोली लावल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT