layoffs | Job Dainik Gomantak
अर्थविश्व

Twitter अन् Meta नंतर आता 'या' कंपनीत होणार कर्मचाऱ्यांची कपात

ट्विटर, मेटा नंतर आता या बड्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरही टांगती तलवार आहे.

दैनिक गोमन्तक

जगातील आघाडीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) , मेटा (Meta) आणि ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन (Amazon) नंतर आता आणखी एक मोठी कंपनी वॉल्ट डिस्ने कर्मचार्‍यांना काढून टाकणार आहे . कंपनीने नवीन कर्मचारी घेण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. यासोबतच कंपनी अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून (Job) काढून टाकण्याचा विचार करत आहे. अलीकडेच वॉल्ट डिस्नेने (Walt Disney) जाहीर केले आहे, की ते काही काळापासून खूप नुकसान सहन करत आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब चापेक यांनी उच्च अधिकाऱ्यांना सांगितले की, आम्ही आगामी काळात काही कठोर निर्णय घेऊ शकतो. कंपनीतील टार्गेट हायरिंगची प्रक्रिया तातडीने बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यासोबतच त्यांनी सांगितले की, आगामी काळात कंपनी आपले नुकसान भरून काढण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू शकते.

  • कंपनीला मोठ्या प्रमाणावर तोटा झाला आहे

रिपोर्ट्सनुसार, वॉल्ट डिस्नेच्या तिमाही निकालांनुसार, कंपनीला सुमारे $1.5 बिलियनचे नुकसान झाले आहे. बुधवारी कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी बॉब चापेक यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना पुढे सांगितले की कंपनीच्या तोट्याचे कारण काही मोठे आर्थिक घटक आहेत. जे आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. यासोबतच ते म्हणाले की, कंपनीत कपात करूनही ग्राहकांना गुणवत्तेत कोणताही फरक दिसणार नाही.

  • मेटा, ट्विटर आणि अॅमेझॉननेही केली कपात

याआधी ट्विटर, मेटा आणि अॅमेझॉननेही आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली आहे. एलन मस्कच्या ट्विटर टेकओव्हरनंतर, सुमारे 50 टक्के कर्मचारी काढून टाकण्यात आले आहेत. याशिवाय फेसबुकची मूळ कंपनी मेटा लेऑफनेही आपल्या 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. यानंतर, जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅमेझॉनने वाढत्या आर्थिक मंदीच्या नादात आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने नवीन नियुक्ती पूर्णपणे थांबवली आहे आणि तिच्या रोबोटिक्स विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

SCROLL FOR NEXT