senior citizen Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office Scheme: ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा लाभ घेण्यासाठी वाचा सविस्तर ...

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) समाविष्ट आहे.

दैनिक गोमन्तक

जर तुम्ही आपल्या भविष्यासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनामध्ये ते करू शकता. या योजनामध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच यामध्ये गुंतवलेले पैसे देखील सुरक्षित असतात, जर बँक डिफॉल्ट असेल तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतील. पण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनामध्ये अगदी कमी रकमेतून गुंतवणूक सुरू करता येते. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना समाविष्ट आहे. चला या योजनेबद्दल जाणून घेऊया.

* व्याज दर

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये सध्या 7.4 टक्के वार्षिक व्याजदर आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू होणार आहे. 31 मार्च ,30 सप्टेंबर, 31 सप्टेंबर रोजी ठेवीच्या तारखेपासून पहिल्या घटनेत व्याज दिले जाते आणि त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर व्याज दिले जाते.

* गुंतवणूक रक्कम

या अल्पबचत योजनेमध्ये 1000 रुपयांच्या पटीत फक्त एकदाच रक्कम जमा करावी लागते. 1000 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीची रक्कम 15 लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही.

कोण लाभ घेऊ शकतो?

60 वर्षावरील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शिवाय 55 वर्षावरील आणि 60 वर्षापेक्षा कमी वयाचा सेवानिवृत्त नागरी कर्मचारी लाभ घेऊ शकतो.

* मॅच्योरिटी

या योजनेत खाते उघडण्यासाठी तारखेपासून पाच वर्षांनी बंद केले जाऊ शकते यासाठी त्या व्यक्तीने पासबूकसह (Pass book) योग्य तो अर्ज संबंधित पोस्ट ओफिसमध्ये जमा करावा लागतो.

* टॅक्सची सूट

या अल्पबचत योजनेत गुंतवलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80c अंतर्गत सूट मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Ashadhi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

Parra Crime: पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने खुनी हल्ला, एकजण गंभीर जखमी; साखळीत युवकाला अटक

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

SCROLL FOR NEXT