Kia Motors Dainik Gomantak
अर्थविश्व

Kia Motors: कियाच्या Sonet, Seltos आणि Carens चे डिझेलचे मॉडेल लॉन्च; किंमत, फिचर्स जाणून घ्या

किया मोटर्सने (Kia) यापूर्वीच Sonet, Seltos, Carens मॉडेल कार बाजारात आणल्या आहेत.

Pramod Yadav

किया मोटर्सने (Kia) यापूर्वीच Sonet, Seltos, Carens मॉडेल कार बाजारात आणल्या आहेत. किया कार्स रिअल ड्रायव्हिंग मानकानुसार डिझाइन केलेल्या टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहेत. या सर्व नवीन कार इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन (iMT) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

आता Kia ने iMT तंत्रज्ञानाने सुसज्ज Sonet, Seltos, Carens चे डिझेल मॉडेल लॉन्च केले आहेत

नवीन सोनेट डिझेल मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 9.95 लाख रुपये आहे. याशिवाय, आयएमटी (iMT) तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या सेल्टोस (Seltos) डिझेल व्हेरिएंटची किंमत 12.39 लाख रुपये आहे आणि केरेन्स (Carens) डिझेल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 12.65 लाख रुपये आहे.

Kia ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये, सेल्टोसची 20 टक्के विक्री आणि 33 टक्के सॉनेट विक्री iMT कारमधून झाली. देशातील सध्याच्या ट्रॅफिक संकटामुळे बरेच खरेदीदार स्वयंचलित कारकडे आकर्षित झाले आहेत. आयएमटी तंत्रज्ञान क्लचलेस मॅन्युअल आहे. यामुळे कार रहदारीच्या परिसरात चालविणे सोपे जाते.

सर्व Kia मॅन्युअल ट्रान्समिशन डिझेल कार आता 6iMT आवृत्तीमध्ये अपग्रेड केल्या जातील. कंपनीच्या या सर्व गाड्या RDE मानकानुसार ऑफर केल्या जातील. सेल्टोस, सोनेट आणि कॅरेन्सच्या 2023 आवृत्त्या या वर्षी 1 एप्रिलपासून उपलब्ध आहेत.

या वर्षी मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारात 21,501 किआ कार विकल्या गेल्या. गेल्या महिन्यात, 8,677 मॉडेल्सच्या विक्रीसह कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी सोनेट ठरली, त्यानंतर सेलटोसच्या 6,554 कार आणि केरेन्स मॉडेलच्या 6,102 कार होत्या. आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे तर, Kia India ने FY23 मध्ये 85,754 कार निर्यात केल्या, तर मार्च 2023 मध्ये एकट्या कंपनीने विदेशी बाजारपेठेत 6,200 कार निर्यात केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT