Jio App  Dainik Gomantak
अर्थविश्व

YouTube, Instagram वर Jio अ‍ॅपचा उतारा; व्हिडिओ क्षेत्रात धुमाकूळ घालण्यास जिओ सज्ज

व्हिडिओ क्षेत्रात Jio अ‍ॅप नवा ट्रेन्ड घेऊन येत आहे. यासाठी जिओने पूर्ण तयारी देखील केली आहे.

Pramod Yadav

मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला YouTube चे वेड आहे. दिवसांतून एक ते दोन तास प्रत्येकजण YouTube घालवत असतो. व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणून YouTube अत्यंत प्रसिद्ध अ‍ॅप झाले असून, अनेकांना यातून आर्थिक उत्पन्न देखील मिळत आहे. याशिवाय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म Instagram शॉर्ट व्हिडिओ क्षेत्रात धुमाकूळ घालत आहे. अशात आता या क्षेत्रात Jio अ‍ॅप नवा ट्रेन्ड घेऊन येत आहे. यासाठी जिओने पूर्ण तयारी देखील केली आहे.

Jio च्या या अ‍ॅपमध्ये OTT प्लॅटफॉर्मसह ऑनलाइन व्हिडिओ पाहणे तसेच, आपण त्यावर आपले व्हिडिओ पोस्ट करता येतील. शॉर्ट व्हिडिओ देखील या प्लॅटफॉर्मवरती अपलोड करता येतील. जिओच्या या सिंगल व्हिडिओ अ‍ॅपवर युझर्सला आयपीएल सामने, चित्रपट, छोटे व्हिडिओ आणि वेब शो पाहता येतील.

जिओच्या या नवीन शॉर्ट व्हिडिओ स्ट्रीमिंग अ‍ॅपचे नाव समोर आलेले नाही. रोलिंग स्टोन इंडिया आणि क्रिएटिव्ह आयलँड एशिया यांच्यासोबत जिओने या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. अ‍ॅप लाँच करण्यापूर्वी जिओने अनेक गायक, संगीतकार, अभिनेते, कॉमेडियन, डान्सर आणि इतर निर्मात्यांसोबत करार केला आहे. अशी माहिती समोर आली आहे.

Jio च्या शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅपवर सिल्व्हर, ब्लू आणि रेड टिक व्हेरिफिकेशन असेल. या अ‍ॅपमध्ये क्रिएटर्स देखील प्रोफाइल आहे. अॅपच्या मध्यमातून कमाई देखील करता येईल. सध्या या अ‍ॅपची चाचणी केली जात आहे. जानेवारी 2023 पर्यंत, जिओ शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT