जिओ आपल्या वापरकर्त्यांना अनेक आकर्षक योजना ऑफर करते. कमी किमतीच्या प्रीपेड योजनांपासून ते दीर्घकालीन वैधता योजनांपर्यंत, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक आकर्षक रिचार्ज आहेत. कंपनी अशा अनेक योजना देखील ऑफर करते, जे काही विशिष्ट फोनसाठी म्हणजेच Jio फोनसाठी आहेत. कंपनीने अशा ग्राहकांसाठी जिओ फोन लॉन्च केला आहे ज्यांना फीचर फोनमध्ये काही स्मार्ट वैशिष्ट्ये हवी आहेत.
जर तुमच्या स्मार्टफोनची (Smartphone) बॅटरी पावर लहान असेल, कॉम्पॅक्ट डिझाइन, सोशल मीडिया यांसारखी मूलभूत वैशिष्ट्ये हवी असतील, तर Jio फोन हा एक चांगला पर्याय बनू शकतो.
सध्या कंपनी या फीचर फोनसोबत आकर्षक ऑफर्सही (offers) देत आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्हाला Jio फोन फक्त रिचार्ज प्लॅन खरेदी केल्यावर मोफत मिळेल. यासोबतच तुम्हाला अनेक टेलिकॉम फायदेही मिळतील. या योजनेची माहिती जाणून घेऊया.
जिओचे 1999 रुपयांचे रिचार्ज
जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना दोन वर्षांची वैधता मिळेल. म्हणजेच, तुम्हाला 1999 रुपये एकदाच खर्च करावे लागतील आणि त्यानंतर दोन वर्षे कोणतेही टेन्शन नाही. मात्र, यामध्ये फारच कमी डेटा उपलब्ध आहे.
या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सेवा मिळते. यासोबत तुम्हाला Jio Phone पण मिळेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना 48GB डेटा मिळतो. ही योजना नवीन वापरकर्त्यांसाठी आहे. यासोबत तुम्हाला जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मिळेल.
जिओचा 1499 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Jio Phone सह एक वर्षाची वैधता मिळते. रिचार्ज प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलसह येतो. यामध्ये यूजर्सना एकूण 24GB डेटा मिळतो.
यासोबत तुम्हाला जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मिळेल. Jio फोनमध्ये 4G सपोर्ट उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये टॉर्च, एफएम रेडिओ, रिंगटोन, कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्पीकर, कॉल हिस्ट्री यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.