है गर्मी! कडक उन्हामुळे कूलिंग प्रोडक्ट्स दरात 50 टक्क्यांनी वाढ

AC, कूलर आणि फ्रीज सारख्या थंड उत्पादनांच्या विक्रीत वार्षिक आधारावर 50% पर्यंतची वाढ झाली आहे.
Cooling Products
Cooling ProductsDainik Gomantak

यंदा मार्चपासून कडाक्याच्या उन्हाचा थेट फायदा कूलिंग प्रोडक्ट्सच्या बाजारपेठेवर होताना दिसत आहे. गेल्या एका महिन्यात, AC, कूलर आणि फ्रीज सारख्या थंड उत्पादनांच्या विक्रीत वार्षिक आधारावर 50% पर्यंतची वाढ झाली आहे. चालू महिन्यात आणि मे महिन्यानध्ये मध्ये जोरदार विक्रीसह, कूलिंग प्रोडक्ट्स व्यवसाय प्री-COVID पातळीपेक्षा चांगला वाढेल अशी अपेक्षा आहे. (Cooling products prices rise by 50 per cent due to severe heat)

Cooling Products
फोनवर बोलत असताना आवाज येत नाही? मग या गोष्टी ताबडतोब तपासा

साधारणत: एप्रिलमध्ये उष्णता वाढल्याने एसी (AC), कुलर (Cooler) आणि फ्रीजची (Fridge) विक्री वाढताना दिसत आहे. मात्र यंदा महिनाभरापूर्वीच्या कडाक्याच्या उन्हामुळे विक्रीत वाढ झाली आहे. व्हाईट गुड्स उद्योगातील काही लोकांच्या मते, एसी, कुलर आणि फ्रीजच्या मागणीने कोविडपूर्व पातळी ओलांडली आहे. गेल्या महिन्यात कुलर आणि एसीच्या विक्रीत 40-50% वाढ झाली. कच्चा माल महागल्याने त्यांच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. असे असूनही विक्रीत कोणतीही घट झालेली दिसून येत नाही.

गेल्या दोन वर्षांत उन्हाळी हंगाम लॉकडाऊनमध्येच गेला,

खरे तर कोविडमुळे गेल्या दोन वर्षांचा उन्हाळा लॉकडाऊनमध्येच गेला आहे. यामुळे कूलिंग उत्पादनांची मागणी वाढताना दिसत आहे. पॅनासोनिक इंडियाचे बिझनेस हेड गौरव शाह म्हणाले की, मागणी वाढल्यामुळे मार्चमध्ये एअर कंडिशनरच्या विक्रीत विक्रमी वाढ झाल्याचे चित्र आहे. 2021 च्या तुलनेत मूल्याच्या बाबतीत विक्री सुमारे 25 टक्क्यांनी वाढली आहे. आम्हाला यावर्षी सर्व क्षेत्रांमध्ये मजबूत विक्रीची अपेक्षा आहे, तर एसीच्या विक्रीत 30% वाढ अपेक्षित आहे.

किंमती वाढल्या, पण

स्टील आणि तांबेसारख्या धातूंच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्च देखील वाढला आहे. हायर अप्लायन्सेस इंडियाचे अध्यक्ष सतीश एनएस म्हणाले की, आम्हाला रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि एसीच्या किमती 5 ते 6% ने वाढवाव्या लागल्या आहेत तर असे असूनही, यंदा विक्रीत चांगली वाढ देखील अपेक्षित आहे. लोक कूलिंग प्रोडक्ट्सवर खर्च करण्यास तयार आहेत. आम्हाला एअर कंडिशनरच्या विक्रीमध्ये 40-50% वाढ अपेक्षित आहे. मार्चमध्येच विक्री वार्षिक 50% वाढली आहे.

Cooling Products
UltraTech Cement ने UAE च्या कंपनीत केली गुंतवणूक, शेअर्सची खरेदी वाढणार!

कंपन्यांचे शेअर्सही गगणाला भिडले

कूलिंग उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांच्या उत्पादनाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ झाली. गेल्या एका महिन्यात व्होल्टास, ब्लू स्टार सिम्फनी, अंबर एंटरप्रायझेस, जॉन्सन कंट्रोल्स, शार्प इंडिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 5 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com