Vande Bharat Express  Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat Express: अश्विनी वैष्णव देणार मोठी भेट, लवकरच 'या' मार्गावर धावणार वंदे भारत!

Jabalpur Indore Vande Bharat Express: देशातील सर्वात वेगवान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता प्रवासासाठी लोकांची पहिली पसंती बनत आहे.

Manish Jadhav

Jabalpur Indore Vande Bharat Express: देशातील सर्वात वेगवान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता प्रवासासाठी लोकांची पहिली पसंती बनत आहे. ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आहे. देशातील इतर गाड्यांपेक्षा ती वेगाने धावू शकते. आता वंदे भारत एक्सप्रेस 10 मार्गांवर धावत आहे.

दरम्यान, सरकार (Government) लवकरच 11 व्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. मध्य प्रदेशसाठी ही पहिली वंदे भारत असेल. एप्रिलमध्ये जबलपूर ते इंदूर दरम्यान धावणे अपेक्षित आहे. एप्रिलच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी याला ग्रीन सिग्नल दाखवू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, या गाडीला भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरही थांबा असेल. ही ट्रेन फेब्रुवारीच्या पहिल्या महिन्यातच रवाना होणार होती. पण, महाराष्ट्रात लॉन्च होण्यास विलंब झाला. आता मध्य प्रदेशला लवकरच पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहे. भोपाळमध्ये (Bhopal) ट्रेन मेन्टेनन्स सेंटरच्या उभारणीवर 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

आता, आम्ही तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेसच्या फिचर्सबद्दल सांगणार आहोत. या ट्रेनचा कमाल वेग ताशी 180 किमी आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, ट्रेन सध्या जास्तीत जास्त 130 किमी प्रतितास वेगाने चालवली जात आहे.

तसेच, वंदे भारत एक्स्प्रेसची रचनाही त्याला खास बनवते. जी भारतीय रेल्वेच्या बॉक्सी, मस्क्युलर ट्रेनपेक्षा अधिक आधुनिक आणि टोकदार आहे. पांढऱ्या आणि निळ्या रंगाची दुहेरी रंग योजना देखील आकर्षक आहे.

या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे

मार्ग 1: नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस

मार्ग 2: नवी दिल्ली - श्री माता वैष्णो देवी कटरा (J&K) वंदे भारत एक्सप्रेस

मार्ग 3: गांधीनगर आणि मुंबई वंदे भारत एक्सप्रेस

मार्ग 4: हिमाचल प्रदेश वंदे भारत एक्स्प्रेसमधील अंब अंदौरा ते नवी दिल्ली

मार्ग 5: चेन्नई-म्हैसूर वंदे भारत एक्सप्रेस

मार्ग 6: नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस

मार्ग 7: हावडा-न्यू जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेस

मार्ग 8: सिकंदराबाद-विशाखापट्टणम वंदे भारत एक्सप्रेस

मार्ग 9: मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस

मार्ग 10: मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT