ITR Notice Dainik Gomantak
अर्थविश्व

ITR Notice: करदात्यांना धडाधड येताहेत नोटीस; या सूचना पाळा अन् संकट टाळा

ITR : जर करदात्याने इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म मध्ये चुकीची माहिती दिली, तर आयकर विभाग त्याला वेगवेगळ्या कायद्यांतर्गत नोटीस पाठवू शकतो.

Ashutosh Masgaunde

How to Avoid ITR Notice: एका कार्यक्रमादरम्यान माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, देशातील १ लाख करदात्यांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.

ITR वेळेवर न भरणे, उत्पन्न-कपात किंवा इतर प्रकारची माहिती चुकीची असल्याचे आढळून आल्यास तुम्हालाही नोटीस येऊ शकते.

आयकर विभागाची नोटीस टाळण्यासाठी हे करा

आयटीआर वेळेत भरा: आयकर विभाग काही वेळा आयटीआर भरत नसल्याबद्दल करदात्यांना नोटीस पाठवतो. जर तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल तर आयटीआर भरणे अनिवार्य आहे.

समजा तुम्ही भारतीय नागरिक आहात. पण तुम्ही परदेशी संपत्तीचे मालक आहात. या परिस्थितीतही तुम्हाला आयटीआर भरावा लागेल. अन्यथा आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकतो.

TDS मधील चुका टाळा: ITR भरताना TDS काळजीपूर्वक भरा. दाखल केलेला टीडीएस आणि तो कुठे जमा केला आहे यात तफावत असल्यास, तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते. म्हणून, ITR भरण्यापूर्वी, किती TDS कापला गेला आहे ते पाहा.

सर्व उत्पन्न स्रोतांची माहिती द्या : तुम्हाला एका आर्थिक वर्षात किती कमाई झाली याची माहिती आयटीआरमध्ये द्यावी लागेल. यासोबतच गुंतवणुकीची माहितीही द्यावी लागेल.

अशा परिस्थितीत जर तुम्ही गुंतवणुकीतील उत्पन्न लपवले तर तुम्हाला नोटीस मिळू शकते. नोटीस टाळण्यासाठी, तुमच्या बँकेकडून व्याजाचे विवरण मागवा आणि ते ITR मध्ये टाका. याशिवाय इतर स्रोतातून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती द्या.

आयटीआर रिटर्नमध्ये चूक: आयकर रिटर्न भरताना अनेक वेळा लोक चुका करतात. लोक आवश्यक तपशील भरण्यास विसरतात. असे झाल्यास आयकर विभाग नोटीस पाठवू शकतो. म्हणून, ते स्वतः भरण्याव्यतिरिक्त, तुम्ही फक्त एखाद्या व्यावसायिकाकडूनच ITR भरू शकता.

अंतिम मुदतीची वाट पाहू नका: आयटीआरमध्ये अचूक माहिती भरण्याचा सल्ला देण्याबरोबरच आयकर विभागाकडून हेही सांगितले जात आहे की, आयटीआर फाइलिंगच्या शेवटच्या तारखेची वाट पाहू नका.

ITR भरण्यासाठी अजून पाच दिवस बाकी आहेत. त्याची अंतिम मुदत आयकर विभागाने ३१ जुलै २०२३ निश्चित केली आहे. वास्तविक, शेवटच्या क्षणी कर भरताना चुकांचा धोका वाढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT