ITR Filing Dainik Gomantak
अर्थविश्व

ITR Filing: आयटीआरमध्ये खोटा क्लेम करणं पडू शकतं महागात, तुरुंगवासही होऊ शकतो; आयकर विभागाने नियमांत केला मोठा बदल!

ITR Filing Old Tax Regime: सध्या करदात्यांना आयटीआर दाखल करण्यासाठी जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. परंतु आता जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयटीआर दाखल करणे कठीण होऊ शकते.

Manish Jadhav

Income Tax Claim Fraud: सध्या करदात्यांना आयटीआर दाखल करण्यासाठी जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. परंतु आता जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयटीआर दाखल करणे कठीण होऊ शकते. कारण आयकर विभागाने जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयटीआर दाखल करण्याशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. जर तुम्ही आयटीआर फाइलमध्ये काही चूक केली तर तुम्हाला 200 टक्के दंड भरावा लागू शकतो. एवढचं नाहीतर तुरुंगवास देखील होऊ शकतो. चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

कोणते बदल आहेत?

जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयटीआर (ITR) दाखल करु इच्छिणाऱ्या लोकांना आता विविध कलमांचे फायदे मिळवण्यासाठी अधिक तपशील आणि कागदपत्रे प्रदान करावी लागतील. हे बदल आयकर विभागाने विशेषतः कलम 80C, 80D, HRA, 80EE, 80EEB मध्ये केले आहेत.

Section 80C

कलम 80 सी अंतर्गत जर करदात्याला पीपीएफ, ईपीएफ, एनएससी, जीवन विम्यावर कर बचत मिळवायची असेल तर आता त्याला अधिक डिटेल्स द्यावे लागतील. या डिटेल्समध्ये पावती क्रमांक, पॉलिसी किंवा कागदपत्रे आयडी, अकाऊंट डिटेल्स आणि पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचे नाव यासारखे डिटेल्स समाविष्ट आहेत.

Section 80D

कलम 80डी अंतर्गत, जर करदात्याला विमा प्रीमियमवर कर कपातीचा दावा करायचा असेल, तर त्याला अधिक डिटेल्स द्यावे लागतील. उदाहरणार्थ, विमा घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, पॉलिसी क्रमांक किंवा पावती क्रमांकाचा पुरावा द्यावा लागेल. जर तुम्ही दुसऱ्या कोणासाठी विमा घेतला असेल, तर तुम्हाला त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे हे सांगावे लागेल.

House Rent Allowance (एचआरए)

कलम 10 (13 A) अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने भाडे भरण्यासाठी टॅक्स क्लेम केला तर त्याला माहिती देखील द्यावी लागेल. जसे की, तुम्ही कुठे काम करता, कोणत्या तारखेला एचआरए प्राप्त झाला किंवा किती भाडे दिले जात आहे. यामध्ये भाडे पावती किंवा घरमालकाचे नाव आणि पॅन क्रमांक (जर तुमचे भाडे 1 लाखांपेक्षा जास्त असेल तर) समाविष्ट आहे.

Section 80E/EEB (सेक्शन 80ई/ईईबी )

कलम 80ई अंतर्गत, जेव्हा मुलासाठी, पतीसाठी किंवा पत्नीसाठी गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्ज घेतले जाते, तेव्हा या कर्जाच्या व्याजावर कर बचतीचा दावा करण्यासाठी या कलमाचा वापर केला जातो. यासाठी, तुम्हाला लोन खाते क्रमांक, व्याज भरण्याचे प्रमाणपत्र आणि वित्तीय संस्थेचे नाव आणि ज्या व्यक्तीसाठी कर्ज घेतले आहे त्याचे नाव द्यावे लागेल. कारण आता प्रत्येक दाव्याची AIS प्रणालीद्वारे तपासणी केली जाते. म्हणून ITR भरताना सर्व कागदपत्रे तयार ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubhanshu Shukla: अभिनंदन! 18 दिवसांचे मिशन पूर्ण करुन शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले; कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग

Konkan Ganpati Special Bus: बाप्पा पावला... गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता, ST च्या 5000 ज्यादा बसेस धावणार

LA Olympics 2028 Schedule: लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 चे वेळापत्रक जाहीर, 128 वर्षांनंतर क्रिकेटचा पुन्हा थरार!

Ro-Ro Ferry in Goa: 56 गाड्या, 100 प्रवासी, AC केबिन, 5 मिनिटांत करा रायबंदर ते चोडण प्रवास; प्रवाशांना मोजावे लागणार 'एवढे' पैसे Video Viral

Glowing Trees Goa: अद्भुत! गर्द काळोखात, गोव्याच्या घनदाट जंगलात 'चमकणारी झाडे'

SCROLL FOR NEXT