ITR Filing 2025: करदात्यांना दिलासा, आयटीआर भरण्याची तारीख वाढली; सीबीडीटीची मोठी घोषणा

ITR Deadline Extended 2025: आयकर रिटर्न (ITR) भरणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली.
ITR Form 16: फॉर्म 16 काय असतो? यामध्ये कोणती माहिती असते, ITR भरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? वाचा संपूर्ण माहिती
Importance Of Form 16 For ITRDainik Gomantak
Published on
Updated on

आयकर रिटर्न (ITR) भरणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली. आता ज्या करदात्यांची खाती ऑडिट झालेली नाहीत ((Non-Audit Taxpayers) ते 31 जुलै 2025 ऐवजी 15 सप्टेंबर 2025 पर्यंत आयटीआर दाखल करु शकतात. आयटीआर फॉर्ममध्ये अलिकडेच मोठे बदल, सिस्टम अपग्रेड आणि टीडीएस (टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स) क्रेडिटमधील त्रुटींमुळे सीबीडीटीने हा निर्णय घेतला. या मुदतवाढीचा उद्देश करदात्यांना योग्य आणि सुरळीत रिटर्न भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देणे आहे.

सूट का देण्यात आली?

दरम्यान, यावर्षी आयटीआर फॉर्ममध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यासोबतच, आयकर फाइलिंग पोर्टलवर सिस्टम अपग्रेडचे कामही केले जात आहे. या तांत्रिक बदलांमुळे करदात्यांना वेळेवर योग्य माहिती भरण्यात अडचणी येत होत्या. याव्यतिरिक्त, अनेक करदात्यांना टीडीएस क्रेडिट जुळवण्यात अडचणी येत होत्या, ज्यामुळे चुकीची कर देयता दिसत होती.

ITR Form 16: फॉर्म 16 काय असतो? यामध्ये कोणती माहिती असते, ITR भरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? वाचा संपूर्ण माहिती
ITR Filing: 'इन्कम टॅक्स रिटर्न' म्हणजे काय? ते भरण्याचे काय आहेत फायदे, किती प्रकारचे आयटीआर फॉर्म असतात? जाणून घ्या

पेनल्टीशिवाय आयटीआर दाखल करण्याची संधी

नवीन तारीख लागू झाल्यानंतर जर करदात्याने 15 सप्टेंबर 2025 पर्यंत आयटीआर दाखल केला तर त्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही. याचा अर्थ असा की, आता करदात्यांना त्यांच्या कर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी दंडाशिवाय अधिक वेळ मिळाला आहे.

ITR Form 16: फॉर्म 16 काय असतो? यामध्ये कोणती माहिती असते, ITR भरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? वाचा संपूर्ण माहिती
ITR Filing: जेलची हवा खायची नसेल तर आयटीआर भरताना 'या' गोष्टी करू नका...

कोणाला फायदा होणार?

या मुदतवाढीचा फायदा विशेषतः वैयक्तिक करदात्यांना आणि ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे अनिवार्य नाही अशा लहान व्यवसायांना होईल. म्हणजेच, पगारदार वर्ग, फ्रीलांसर, छोटे व्यापारी, व्यावसायिक इ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com