Nirmala Sitaraman Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax Return: ITR फाइल न करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! भरावा लागू शकतो एवढ्या हजारांचा दंड

Income Tax Return: ज्या लोकांचे उत्पन्न देशात करपात्र आहे, त्यांनी आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख देखील आहे.

Manish Jadhav

Income Tax Return: ज्या लोकांचे उत्पन्न देशात करपात्र आहे, त्यांनी आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख देखील आहे. लोकांना 31 जुलै 2023 पर्यंत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये केलेली त्यांची कमाई उघड करायची होती आणि आयकर रिटर्न भरायचे होते.

31 जुलै 2023 पर्यंत देशातील करोडो लोकांनी आयकर रिटर्न भरले. तथापि, असे बरेच लोक आहेत ज्यांनी या देय तारखेपर्यंत आयटीआर दाखल केलेला नाही. अशा परिस्थितीत त्या लोकांना दंडही होऊ शकतो.

आयकर रिटर्न

दरम्यान, आयकर विभागाच्या (Income Tax Department) वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर लोकांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना विलंब शुल्काच्या रुपात दंड भरावा लागेल.

जर अशा लोकांनी 31 डिसेंबर 2023 पूर्वी आयकर विवरणपत्र भरले तर त्यांना 5000 रुपये दंड भरावा लागेल. अशा स्थितीत करदात्यांनी ही काळजी घ्यावी.

दंडाची रक्कम

उशिरा दाखल केल्यास 5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न (Income) असलेल्या व्यक्तींना 5,000 रुपये दंड आकारला जातो. आणि ज्यांचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना दंड 1000 रुपये आहे. दुसरीकडे, 31 डिसेंबर 2023 नंतर ITR दाखल केल्यास दंडाची रक्कमही वाढू शकते.

10,000 रुपये दंड

दुसरीकडे, 31 डिसेंबर 2023 नंतर एखाद्या व्यक्तीने ITR फाइल केल्यास त्याला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. देय तारखेपर्यंत विवरणपत्र भरण्यात अयशस्वी झाल्यास, कर देय असल्यास, रिटर्न दाखल होईपर्यंत दरमहा 1% अतिरिक्त व्याज मिळेल.

त्याचवेळी, 31 मार्च 2024 पर्यंत दाखल केलेल्या अद्यतनित रिटर्नसाठी 25% अतिरिक्त कर भरावा लागेल आणि त्यानंतर 31 डिसेंबर 2024 पर्यंत 50% अतिरिक्त कर भरावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

SCROLL FOR NEXT