FM Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Customers Nominee: अर्थमंत्र्यांनी सर्व बँकांना दिला नवा आदेश, करोडो ग्राहकांना लागू होणार नियम

Nirmala Sitharaman To Banks: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँका आणि वित्तीय संस्थांना नवा आदेश दिला आहे.

Manish Jadhav

Nirmala Sitharaman To Banks: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँका आणि वित्तीय संस्थांना नवा आदेश दिला आहे. हा आदेश बँका आणि वित्तीय संस्थांशी संबंधित कोट्यवधी ग्राहकांसाठी आहे.

अर्थमंत्र्यांनी दिलेल्या आदेशात, त्यांच्या सर्व ग्राहकांनी त्यांचा उत्तराधिकारी नामनिर्देशित केला आहे याची खात्री करण्यास सांगितले होते. यामुळे दावा न केलेली रक्कम कमी होण्यास मदत होईल.

केंद्रीय बँकेने बँकांमध्ये दावा न केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या रकमेची ओळख पटवण्यासाठी अलीकडेच आरबीआयने उचललेल्या पावलानंतर अर्थमंत्र्यांचा हा आदेश आला आहे.

उत्तराधिकारी नामनिर्देशित केला

ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) मध्ये सीतारामन म्हणाल्या, 'मला बँकिंग प्रणाली, आर्थिक परिसंस्था (Financial Ecosystem), म्युच्युअल फंड, शेअर बाजार (Stock Market) या संस्थांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा ग्राहक पैशाचा व्यवहार करतो तेव्हा संस्थांनी पाहिले पाहिजे की, ग्राहकांनी त्यांचा उत्तराधिकारी नामनिर्देशित केला, त्याचे नाव आणि पत्ता दिला आहे का?

35,000 कोटींच्या रकमेसाठी दावेदार नाही

एका अहवालानुसार, बँकिंग व्यवस्थेत 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम दावा न केलेली आहे. असा एकूण पैसा एक लाख कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

'टॅक्स हेवन कंट्री' आणि पैशाचे 'राऊंड ट्रिपिंग' हे जबाबदार आर्थिक परिसंस्थेला धोका आहे, असेही सीतारामन म्हणाल्या. हे पैसे ग्राहक आणि त्यांच्या वारसांना सुरक्षितपणे परत करण्यासाठी आरबीआयने (RBI) 'उद्गम पोर्टल' (UDGAM) देखील सुरु केले होते.

दुसरीकडे, हे पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश अनेक दिवसांपासून बँकांमध्ये जमा न केलेल्या रकमेचा शोध घेणे हा होता. जनतेच्या सुविधेसाठी सुरु करण्यात आलेल्या पोर्टलच्या माध्यमातून विविध बँकांमध्ये दावा न केलेली रक्कम शोधणे सोपे होणार आहे.

RBI ने अलीकडेच लाँच केलेल्या पोर्टलवर, SBI, PNB, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धनलक्ष्मी बँक लिमिटेड, साउथ इंडियन बँक लिमिटेड, दावा न केलेल्या ठेवींची माहिती DBS Bank India Ltd आणि Citi Bank मध्ये उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तुम्हाला दिवाळीत काय मिळालं? सोनपापडी की ड्रायफ्रूट्स? 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना थेट iPhone 16 गिफ्ट केला! नेटकरी म्हणाले, 'व्हॅकन्सी आहे का?'

America Sanctions 2026: निवडणुकीतील पराभवाचा राग भारतावर? ट्रम्पकडून भारतीय दाम्पत्यासह 9 कंपन्यांवर कठोर निर्बंध; इराणला मदत केल्याचा आरोप

Private Bus Safety: बसची क्षमता 48, पण प्रवासी तब्बल 140! म्हापशात कामगारांच्या जिवाशी खेळ; खासगी बस ताब्यात

Goa Politics: बोरकरांची खोलकरांना नोटीस; 3 दिवसांत माफी मागा, अन्यथा 6 कोटींचा मानहानी खटला!

WPL 2027 चं बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात स्मृतीची 'आरसीबी' भिडणार हरमनप्रीतच्या 'मुंबई इंडियन्स'शी; पाहा स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक!

SCROLL FOR NEXT