Goa| Plan goa Trip
Goa| Plan goa Trip  Dainik Gomantak
अर्थविश्व

IRCTC Goa Tour Package: या व्हॅलेंटाईन डे करा गोव्याचा प्लॅन, IRCTC देतयं भन्नाट ऑफर

दैनिक गोमन्तक

IRCTC Goa Tour Package: तुम्हालाही व्हॅलेंटाइन डे तुमच्या मित्रांसोबत किंवा लाइफ पार्टनरसोबत बीचवर साजरा करायचा आहे तर तुम्ही गोव्याला जाऊ शकता. गोव्याला जाण्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुम्ही गोवा बीचवर मावळत्या सुर्याचा आनंद घेउ शकता. तसेच तुम्ही रेस्टॉरंटमधील संगीत आणि गोवन फूडचा आस्वाद घेउ शकता. तुम्हालाही 14 फेब्रुवारीला गोव्यात पार्टी करायची असेल तर IRCTC तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर घेऊन आली आहे. तुम्ही बजेट ट्रिपचा आनंद घ्यायला विसरु नका.

IRCTC ने तुमच्यासाठी गोव्याला जाण्याचा सर्वात स्वस्त आणि उत्तम पर्याय आणला आहे.  IRCTC चे गोवा पॅकेज 5 दिवस आणि 4 रात्रींसाठी आहे. या पॅकेजचा लाभ तुम्ही मार्च महिन्यापर्यंत घेउ शकता. तुम्ही IRCTC वेबसाइटवर जाऊन बुकींग करू शकता. तुम्हाला या IRCTC पॅकेजचा लाभ घ्यायचा असेल, तर एका व्यक्तीला 51,000 रुपये खर्च करावे लागतील. दुसरीकडे, दोन व्यक्तींनी बुक केल्यास प्रत्येकी 40,500 रुपये भरावे लागतील. तसेच तीन व्यक्तींच्या बुकिंगसाठी 38,150 रुपये खर्च करावे लागतील.

IRCTC वेबसाइटनुसार जर कोणाला गोव्याला जायचे असेल तर ते तीन टूर पॅकेज अंतर्गत गोव्यासाठी (Goa) तिकीट बुक करू शकतात. 11 फेब्रुवारीपासून गोवा टूर सुरू होत असून ते 7 मार्चपर्यंत चालणार आहे. गोव्यात तुम्ही सी फूडचा आस्वाद घेऊ शकता. तसेच रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गोवन फुड (Goan Food) आणि संगीताचाही आनंद घेऊ शकता.

Goa Beach
  • कोणत्या सुविधा मिळतील

या पॅकेजमध्ये तुम्हाला नॉर्थ आणि साउथ गोव्याचे सौंदर्य पाहायला मिळणार आहे. भुवनेश्वर, चंदीगड, इंदूर आणि पाटणा यांसारख्या ठिकाणांहून लोकांना विमानाने गोव्यात प्रवास करता येणार आहे. यामध्ये 5 नाश्ता आणि 5 रात्रीचे जेवण दिले जाईल.

  • LTC चा लाभ घेऊ शकतो

ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप एलटीसीचा लाभ घेतला नाही त्यांना याचा लाभ घेता येईल. यावर सरकारी कर्मचारी एलटीसी तिकीट टूर पॅकेज घेऊ शकतात. तुम्हाला सर्व माहिती IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल.

  • गोव्यात या ठिकाणांना द्या भेट

तुम्ही साउथ गोव्यातील मिरामार बीच, मांडवी नदीवरील क्रूझ, बागा बीच, कँडोलियम बीच आणि उत्तर गोव्यातील स्नो पार्क यासारख्या ठिकाणी फिरू शकता. याशिवाय तुम्ही सीफूडसाठी रेस्टॉरंट, पब आणि वॉटर स्पोर्ट्स सारख्या ठिकाणी जाऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT