Navratri Special food  Dainik Gomantak
अर्थविश्व

IRCTC Special: चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे IRCTC देणार खास थाळी

भारतीय रेल्वेने (Indian Railway) नवरात्री स्पेशल मेनू सादर केला आहे

दैनिक गोमन्तक

चैत्र नवरात्रीचा अनेक लोक उपवास करतात. तसेच उपवासा दरम्यान प्रवास हा सोयीस्कर व्हावा यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railway) नवरात्री स्पेशल मेनू सादर केला आहे.जो 2 एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. चैत्र नवरात्री दरम्यान जे लोक दुर्गा देवीची नऊ प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळविण्यासाठी साधना अनाई उपवास करतो त्यांच्या अनेक समस्या दूर होतात.

जे लोक नवरात्री दरम्यान प्रवास करत आहेत ते आता चिंतामुक्त होऊ शकतात. कारण इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने त्यांच्या मेनूमध्ये नवरात्रीनिमित्त विशेष खाद्यपदार्थांचा समावेश केला आहे. या पदार्थांची (Food) किंमत केवळ 99 रु. पासून सुरू होते. आयआरसीटीसीच्या खास मेनूमध्ये कोणते पदार्थ असतील हे पाहूया.

* आलू चाप

हे नारळ, शेंगदाणे, साबुदाणा पासूयन बनवला जातो.

* साबुदाणा वडा

साबुदाणा वडा सोनेरी तपकिरी आणि पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत तळलेले असते. हे दह्यासोबत सर्व्ह केला जातो.

* पनीर मखमली आणि साबुदाणा खिचडी थाळी

यामध्ये साबुदाणा खिचडी, सिंघडा आलू पराठा, पनीर मखमली, अरबी मसाला, आलू चाप आणि सीताफळ खीर यांचा समावेश आहे.

* कोफ्ता करी आणि साबुदाणा खिचडी

या थाळीमध्ये साबुदाणा खिचडी, सिंघडा आलू पराठा, कोफ्ता करी, आलू चाप आणि सीताफळ खीर यांचा समावेश आहे.

* पनीर मखमली आणि पराठे

यामध्ये पनीर मखमली, आलू पराठा यांचा समावेश आहे.

* साबुदाणा खिचडी आणि दही

उपवासाच्या वेळी हा सर्वांचा अतिशय आवडता पदार्थ आहे, जो साबुदाण्यापासून बनवला जातो आणि त्यात हिरवी मिरची, मोहरी आणि शेंगदाणे भाजलेले असतात.

* मिष्टान्न

सीताफळ खीर जि प्रत्येकाला आवडेल.

*ही थाळी कशी बुक करायची

प्रवाशांना 28 मार्चपासून तिकिटांवर ही थाळी बुक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रवासी IRCTC ची ई-कॅटरिंग सेवा वापरू शकतात किंवा क्रमांक- 1323 द्वारे बुक करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT