iPhone 16e discount New Year 2026 Dainik Gomantak
अर्थविश्व

iPhone घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, iPhone 16e वर तब्बल 18 हजार रुपयांचा डिस्काउंट; 'इतक्या' किंमतीत मिळेल फोन!

iPhone 16e Discount New Year 2026: नवीन वर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Sameer Amunekar

iPhone 16e Discount Offer: नवीन वर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच सर्वोत्तम वेळ आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या ॲपलच्या अत्यंत लोकप्रिय iPhone 16e मॉडेलच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना मागे टाकत एका प्रसिद्ध रिटेलरने ही तगडी सवलत जाहीर केली असून, ग्राहकांना सुमारे १८,००० रुपयांहून अधिक बचत करण्याची संधी मिळत आहे.

किंमतीत मोठी घसरण आणि बँक ऑफर्स

iPhone 16e गेल्या वर्षी ५९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झाला होता. मात्र, नवीन वर्षाच्या निमित्ताने 'विजय सेल्स'मध्ये (Vijay Sales) हा फोन चक्क ४४,४९० रुपयांच्या सवलतीच्या दरात लिस्ट करण्यात आला आहे. म्हणजे थेट १५,५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे.

एवढेच नाही तर, निवडक बँकांच्या कार्डवर १०% किंवा ३,००० रुपयांपर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंटही दिला जात आहे. या सर्व सवलतींचा विचार केला तर, ५९,९०० रुपयांचा हा फोन ग्राहकांना अंदाजे ४१,४९० रुपयांच्या आसपास पडू शकतो, ज्यामुळे मूळ किमतीत सुमारे १८,४१० रुपयांची बचत होत आहे.

ज्यांना एकदम मोठी रक्कम भरणे शक्य नाही, त्यांच्यासाठी नो-कॉस्ट ईएमआयची (No-cost EMI) सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहक दरमहा केवळ २,०३१ रुपयांच्या हप्त्यावर हा आयफोन घरी नेऊ शकतात.

हा फोन १२८ जीबी आणि २५६ जीबी अशा दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ५जी (5G), वायफाय, ब्लूटूथ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे युएसबी टाइप-सी (USB Type-C) पोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे.

iPhone 16e चे दमदार फीचर्स

या आयफोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, जो १२00 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. कामगिरीच्या बाबतीत हा फोन अत्यंत वेगवान आहे, कारण यात ॲपलचा शक्तिशाली A18 Bionic चिपसेट वापरण्यात आला असून तो लेटेस्ट iOS 18 वर काम करतो.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, याच्या मागील बाजूस ४८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा दिला आहे, जो उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी ओळखला जातो. तर सेल्फीसाठी १२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kushavati: गोव्यातला महाकाय भग्न नंदी, शिवालयाचे भग्नावशेष, शेकडो वर्षांच्या इतिहासाचा कोट; 'कुशावती' नदीकाठी वसलेली संस्कृती

इम्रान खान यांचं समर्थन करणं पडलं महागात! पाकिस्तानात 4 पत्रकारांसह 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा; सोशल मीडिया पोस्ट ठरली गुन्हा

Viral Video: रात्रीचं दाट धुकं अन् समोरचं काहीच दिसेना, ड्रायव्हरनं लढवली अशी शक्कल की तुम्हीही म्हणाल 'नादच खुळा'! पाहा व्हिडिओ

Assonora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Unity Mall Goa: युनिटी मॉलच्या कामाला ब्रेक; न्यायालयाकडून 'जैसे थे' स्थितीचे आदेश

SCROLL FOR NEXT