Apple Dainiik Gomantak
अर्थविश्व

Apple ला मोठा धक्का! IPhone 14 जलवा शकला नाही, कंपनीने घेतला मोठा निर्णय

IPhone 14: एवढी प्रतीक्षा करुनही आयफोन 14 आपला जलवा दाखवू शकला नाही आणि यामुळेच कंपनीला मोठा निर्णय घ्यावा लागला.

दैनिक गोमन्तक

IPhone 14 Production Being Reduced: स्मार्टफोन निर्माता कंपनी Apple ने सप्टेंबर 2022 मध्ये आपली लेटेस्ट स्मार्टफोन सीरीज, IPhone 14 सीरीज लाँच केली, ज्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. जगभरात या सीरीजच्या लॉन्चची आतुरतेने वाट पाहिली जात होती. तुमच्या माहितीसाठी, IPhone 14 लॉन्च केल्यानंतर कंपनीला मोठा झटका बसला आहे. एवढी प्रतीक्षा करुनही आयफोन 14 आपला जलवा दाखवू शकला नाही आणि यामुळेच कंपनीला मोठा निर्णय घ्यावा लागला.

IPhone 14 जलवा दाखून शकला नाही

IPhone 14 ला फारसे पसंत केले जात नाहीये. ते फोनच्या विक्रीत दिसून येत आहे. खरं तर, ब्लूमबर्गच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, कंपनी आपल्या नवीन आयफोनचे (IPhone) उत्पादन वाढवण्याच्या योजनेपासून मागे हटत आहे, कारण ते विकले जात नाहीत. IPhone 14 आणि IPhone 13 मध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे लोक जुन्या मॉडेलकडे आकर्षित होत आहेत.

Apple ला मोठा धक्का

फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अ‍ॅमेझॉन (Amazon) या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सेल सुरु आहे. दरम्यान, असे दिसून येत आहे की, आयफोन 13 दोन्ही ठिकाणी स्टॉकमध्ये नाहीये. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की, ज्यांना नवीन आयफोन घ्यायचा आहे, ते आयफोन 14 ऐवजी आयफोन 13 कडे वळत आहेत. जेव्हा दोन्ही मॉडेल्समध्ये फारसा फरक नसतो तेव्हा ग्राहक जुने मॉडेल खरेदी करण्याचा निर्णय घेतात.

कंपनीने एवढा मोठा निर्णय घेतला

ब्लूमबर्गच्या अहवालात कंपनीकडून अपेक्षित मागणी नसल्याचे लिहिले आहे. अहवालातील सूत्रांचे म्हणणे आहे की, कंपनी आणखी सहा दशलक्ष आयफोन तयार करण्याची योजना आखत होती, परंतु सध्या या योजनेवरील काम थांबवण्यात आले आहे. विक्रीतील ही घट आयफोन 14 च्या प्रो मॉडेल्समध्ये दिसत नाहीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT