Fix Deposit
Fix Deposit  Dainik Gomantak
अर्थविश्व

Fixed Deposits मध्ये गुंतवणूक होणार आकर्षक; व्याजदरात वाढ

दैनिक गोमन्तक

आता आपल्या कष्टाचे पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत FD वर अधिक परतावा मिळणार आहे. RBI ने रेपो दरात 40 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि CRR (Cash Reserve Ratio) 50 बेसिस पॉइंट्सने वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांनी FD वर व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. पण जे FD स्वरूपात बँकेत ठेव ठेवतात त्यांना जास्त परतावा मिळणार आहे. (Investing in Fixed Deposits will be attractive; Rise in interest rates)

आरबीआयने 4 मे रोजी रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक बँकांनी ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. ज्यामध्ये बंधन बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा, ICICI बँक यांचा समावेश आहे. या बँकांनी किरकोळ ग्राहकांसाठी वेगवेगळ्या मुदतीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने 390 दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात 30 बेसिस पॉईंट्सने आणि 23 महिन्यांच्या एफडीवरील एफडी दरांमध्ये 35 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे.

बंधन बँकेने एक वर्ष ते 18 महिने आणि 18 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीतील FD वर व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुरुवात असली तरी आगामी काळात अनेक बँका मुदत ठेवी आकर्षक करण्यासाठी व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

खरंतर, गेल्या काही वर्षांत एफडीवरील व्याजदर लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार बँकांमध्ये पैसे ठेवण्याऐवजी चांगल्या परताव्यासाठी म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटसारख्या जोखमीच्या परताव्यात गुंतवणूक करत होते. पण सध्या तरी आरबीआयने रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केली असली तरी येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत मुदत ठेवींवरील व्याजदर वाढण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT