Inflation  Dainik Gomantak
अर्थविश्व

होळीआधी महागाईत वाढ; ग्राहकांना 5 मोठे झटके

पीएफवरील व्याजदरात कपात, दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

होळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. यंदा 18 मार्च रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. मात्र, होळीपूर्वी सर्वसामान्यांना पाच मोठे झटके बसले आहेत. यामध्ये ईपीएफवरील व्याजदरात कपात, दुधाच्या दरात वाढ अशा गोष्टींचा समावेश आहे. या निर्णयांचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसताना दिसत आहे.

1. ईपीएफ वरील व्याजदरात कपात: या महिन्याच्या 12 तारखेला, EPFO ​​च्या केंद्रीय मंडळाने आर्थिक वर्ष 2021-22 साठी पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवरील व्याजदर कमी करून 8.1 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा लाखों ग्राहकांना फटका बसला आहे. या निर्णयाला अर्थ मंत्रालयाने अद्याप मान्यता दिलेली नाही. गेल्या आर्थिक वर्षात EPFO ​​ने आपल्या ग्राहकांना 8.5 टक्के व्याज दिले होते.

2. दुधाच्या दरात वाढ: या महिन्याच्या सुरुवातीला दुधाच्या (Milk) दरात वाढ झाली. आधी अमूल आणि नंतर पराग, मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली. त्यामुळे या महिन्यापासून सर्वसामान्यांना दूध खरेदीसाठी अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत.

3. घाऊक महागाईची आकडेवारी: सरकारने फेब्रुवारी महिन्याची घाऊक महागाईची आकडेवारी सोमवारी जाहीर केली. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक किमतीवर आधारित महागाई दर गेल्या महिन्यात 13.11 टक्क्यांवर पोहोचला आहे. घाऊक किमतीवर आधारित महागाई सलग 11 व्या महिन्यात वाढल्याने सर्वसामान्यांना याचा धक्का बसला आहे.

4. सीएनजीच्या किमतीत वाढ: उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका संपताच दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या किमती 50 पैशांनी ते एक रुपयाने वाढल्या.

5. व्यावसायिक एलपीजी महाग: कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. कंपन्यांनी दिल्लीत (Delhi) व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 105 रुपयांनी वाढ केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT