Market Dainik Gomantak
अर्थविश्व

तेलाचा भडका! मार्चमध्ये महागाईने गाठला नवा उच्चांक

खाद्यपदार्थ आणि तेलाच्या तेजीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

दैनिक गोमन्तक

खाद्यपदार्थ आणि तेलाच्या महागाईचा परिणाम आता महागाईच्या आकडेवारीवर दिसून येत आहे. किरकोळ महागाईचा दर मार्चमध्ये 6.95 टक्क्यांवर पोहोचला असून, याने आरबीआयचे 6 टक्क्यांचे लक्ष्य ओलांडले आहे. खाद्यपदार्थ आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीमुळे ही किरकोळ महागाई वाढली आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात प्रत्येकी 10 रुपयांनी वाढ झाल्यानंतर मालवाहतूक 15 ते 20 टक्क्यांनी महाग झाल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत घाऊक बाजारात भाजीपाला आणि फळांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, चलनवाढीचा दर फेब्रुवारीमध्ये 5.85 टक्क्यांवरुन मार्चमध्ये 7.68 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारी 2022 मध्ये 6.01% होता, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) च्या आधारे मोजल्या गेलेल्या महागाईने रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank) 6 टक्के लक्ष्य मागे ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT