GDP Dainik Gomantak
अर्थविश्व

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

India GDP Growth: भारताच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का देत शानदार कामगिरी केली.

Manish Jadhav

India GDP Growth: भारताच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का देत शानदार कामगिरी केली. शुक्रवारी (28 नोव्हेंबर) जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर 8.2 टक्क्यांवर पोहोचला. हा वाढीचा दर सहा तिमाहींमधील सर्वाधिक आहे. या आकडेवारीने बाजारातील विश्लेषकांचे अंदाज पूर्णपणे चुकवले. अर्थतज्ज्ञांनी दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ 7.0 टक्क्यांपासून 7.5 टक्क्यांदरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

या दमदार कामगिरीसह भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम राखत आहे. यापूर्वी, सप्टेंबर 2024 तिमाहीत (Q2 FY25) भारतीय अर्थव्यवस्था 7 तिमाहींमधील सर्वात कमी, म्हणजेच 5.6 टक्क्यांनी वाढली होती, तर मागील तिमाहीत ही वाढ 7.८8 टक्के नोंदवली गेली होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने 28 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात सांगितले.

आकडेवारी काय सांगते?

आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत स्थिर किमतींवर वास्तविक जीडीपी 48.63 लाख कोटी रुपये इतका अंदाजित आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत हा आकडा 44.94 लाख कोटी रुपये होता, म्हणजेच 8.2 टक्क्यांची दमदार वाढ नोंदवली गेली. महागाई विचारात घेणारा नाममात्र जीडीपी (Nominal GDP) आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत (Q1) 8.7 टक्क्यांच्या वाढीचा साक्षीदार ठरला.

जीडीपीमधून निव्वळ उत्पादन कर (Net Product Taxes) वजा केल्यावर मिळणारा आणि पुरवठ्यातील वाढ दर्शवणारा वास्तविक GVA (Gross Value Added) दुसऱ्या तिमाहीत 44.77 लाख कोटी रुपये अंदाजित आहे. मागील वर्षी याच तिमाहीत तो 41.41 लाख कोटी रुपये होता, ज्यामुळे 8.1 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

क्षेत्रनिहाय जीडीपी वाढ (Sector-Wise Growth)

या तिमाहीतील जीडीपी वाढीला विविध क्षेत्रांनी मोठा हातभार लावला. उत्पादन क्षेत्राने दुसऱ्या तिमाहीत 9.1 टक्क्यांची अनपेक्षित वाढ नोंदवली, जी एकूण वाढीसाठी निर्णायक ठरली. तृतीय क्षेत्राने एकूण 9.2 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली, ज्याला वित्तीय, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा या उपक्षेत्रांनी 10.2 टक्क्यांच्या वाढीसह मोठा आधार दिला.

व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारण संबंधित सेवांमध्ये 7.4 टक्के वाढ झाली. द्वितीय क्षेत्राने देखील 8.1 टक्क्यांची महत्त्वपूर्ण वाढ नोंदवली. कृषी आणि संलग्न क्षेत्राचा वाढीचा दर 3.5 टक्के राहिला, तर वीज, गॅस, पाणीपुरवठा आणि इतर उपयुक्तता सेवा क्षेत्रात 4.4 टक्क्यांची मध्यम वाढ दिसून आली. एकंदरीत, मजबूत उत्पादन आणि सेवा क्षेत्राच्या बळावर भारतीय अर्थव्यवस्थेने दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा खूप चांगली कामगिरी करुन आपली जागतिक आर्थिक महाशक्ती म्हणून ओळख अधिक मजबूत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

Shani Margi 2025: कर्मफल दाता शनीची चाल 138 दिवसांनंतर बदलली! 'या' 5 राशींच्या लोकांना होणार मोठा धनलाभ, नोकरीत बढतीचाही योग

Asia's Tallest Ram Statue in Goa: ऐतिहासिक क्षण! PM नरेंद्र मोदींच्या हस्ते आशियातील सर्वात उंच 'श्रीरामांच्या मूर्ती'चं अनावरण Watch Video

IND vs SA, 1st ODI: रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास! मैदानात उतरताच मोडणार सचिन-द्रविडचा रेकॉर्ड; बनणार नंबर-1 भारतीय जोडी

SCROLL FOR NEXT