
पणजी: मोठ्या राज्यातील एखाद्या जिल्ह्याएवढ्या आकाराचा असलेला गोवा विकासाच्या बाबतीत उत्तम असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडले. गोव्याने सकल उत्पन्न, दरडोई उत्पन्न आणि शिक्षण यात उत्तम कामगिरी केल्याचे सावंत म्हणाले. गोव्याने सन, सँड आणि सी या प्रतिमेच्या पुढे जात स्पीरिच्युयालिटीचे क्षेत्र म्हणून देखील ओळख निर्माण केल्याचे सावंत म्हणाले.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अंतर्गत आयोजित विभागीय ग्रामीण कार्यशाळा २०२५ या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते. पणजी येथे (०६ जून) रोजी आयोजित या कार्यक्रमाला ग्रामीण विकास आणि संवाद खात्याचे राज्यमंत्री पेमासनी चंद्रशेखर उपस्थित होते. गोव्याची ओळख आता सी, सँड आणि सी याच्या पुढे जाऊन राज्य आता स्पीरिच्युयालिटीचे क्षेत्र म्हणून देखील ओळख जात आहे, असे सावंत म्हणाले.
“गोवा आकाराने लहान राज्य आहे. ३,७०२ किलोमीटर क्षेत्र असलेले हे राज्य एखाद्या मोठ्या राज्यातील जिल्ह्याएवढे आहे. पण, गोव्याने देशात विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. गोव्याने दरडोई उत्पन्नात झेप घेतली आहे, राज्याने १०० टक्के साक्षरतेचे धेय्य गाठले आहे. आणि राज्याचे सकल उत्पन्न देखील उत्तम आहे. गोव्याने इतर राज्यांना मागे टाकले आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
शाश्वत विकासाबाबत बोलताना पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचा आराखडा केंद्राला सादर करणारे गोवा पहिले किनारी राज्य ठरल्याचे सावंत म्हणाले. गोव्यात केंद्राच्या सर्व योजना १०० टक्के यशस्वीपणे राबविल्या असून, ९० टक्के नागरिकांना त्याचा थेट लाभ झाला आहे.
गोव्याची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. सर्वांना घर उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, येत्या काळात आवास योजना जाहीर करु, असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.